Pimpri Chinchwad येथे उद्धव ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखाच्या मुलाची पूर्ववैमनस्यातून हत्या

158

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस फोफावत चालली आहे. देहूरोड विकास नगर या ठिकाणी पुन्हा टोळी युद्धाने डोके वर काढले आहे का? सध्या पिंपरी चिंचवड शहरात खुनाचे प्रकार वाढताना दिसत आहे. त्यावर नागरीकांच्या मनामध्ये पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विभाग प्रमुखाच्या मुलांची हत्या झाली असुन सद्या देहुरोड विकासनगर परिसरात तणावाचे वातावरण आहे.

(हेही वाचा Sandeshkhali case : नराधम शाहजहान शेखला वाचवण्यासाठी TMC सरकार सर्वोच्च न्यायालयात; वकीलपत्र काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी घेतले)

संशयीत आरोपींना ताब्यात घेतले 

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलीस आयुक्तालय अंतर्गत देहूरोड पोलीस स्टेशन हद्दीत ५ मार्च २०२४ रोजी रात्रीच्या वेळेत विकास नगर किवळे नेटके कॉलनी, साई दर्शन सोसायटीसमोर मयत विशाल विजय थोरी या युवकाचा डोक्यात कुंडी व बांबूचे दांडके, सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून निर्घण खून करण्यात आला आहे. देहूरोड पोलिसांनी ४ संशयीत आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.