Nitesh Rane : POK कधी घेणार हे संजय राऊतसारख्या टिनपाट माणसाला का सांगावे; नितेश राणे यांची टीका

Nitesh Rane : नीतेश राणे म्हणाले की, अमित शहा, पंतप्रधान मोदी (Narendra Modi) महाराष्ट्र राज्यात येतात. ते राज्याला काही तरी देण्यासाठी येतात. तुझ्यासारखी गद्दारी करण्यासाठी नाही.

104
Nitesh Rane : POK कधी घेणार हे संजय राऊतसारख्या टिनपाट माणसाला का सांगावे; नितेश राणे यांची टीका
Nitesh Rane : POK कधी घेणार हे संजय राऊतसारख्या टिनपाट माणसाला का सांगावे; नितेश राणे यांची टीका

370 हटविण्याचा काय फायदा झाला, हे भांडूपमध्ये बसून समजणार नाही. त्यासाठी काश्मीरमध्ये जा. पाकव्याप्त काश्मीर (POK) आम्ही घेणारच, पण कधी घेणार? हे संजय राऊत (Sanjay Raut) सारख्या टिनपाट माणसाला का सांगावे? 370 ला पाठिंबा दिला नसता, तर तुमच्या मालकाला लोकांनी मातोश्रीच्या बाहेर काढून मारला असता, असा हल्लाबोल भाजपा (BJP) आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे.

(हेही वाचा – Maha Shivaratri Quotes in Hindi : भगवान शिवाच्या आशीर्वादासाठी हिंदी भाषेतील शुभेच्छा)

अमित शाह यांच्यावरील टीकेचा समाचार

सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. त्याचा आमदार नितेश राणे यांनी समाचार घेतला. नीतेश राणे म्हणाले की, अमित शहा, पंतप्रधान मोदी (Narendra Modi) महाराष्ट्र राज्यात येतात. ते राज्याला काही तरी देण्यासाठी येतात. तुझ्यासारखी गद्दारी करण्यासाठी नाही.

दिशा सालीयन प्रकरणात ‘माझ्या मुलाला वाचवा’ हे सांगण्यासाठी उद्धव ठाकरे नारायण राणे यांना दोन वेळा फोन करतात, तर मोदींजवळ गेले असतीलच. दिशा सालीयन प्रकरणात सबळ पुरावे सापडत असल्याने ठाकरे कुटुंबाची पायाखालची वाळू सरकली आहे, असेही नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.