Nagpur Tiger Cubs Dead : नागपूर येथील पावनी येथे वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू

वाघिणीने बछड्यांना सोडून दिल्याने भुकेने बछड्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

84
Nagpur Tiger Cubs Dead : नागपूर येथील पावनी येथे वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू
Nagpur Tiger Cubs Dead : नागपूर येथील पावनी येथे वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू

राज्यातील नागपूर येथील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पावनी एक संघ बफर क्षेत्रात रविवारी वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले. वनाधिकाऱ्यांच्या गस्ती पथकाला कक्ष क्रमांक २५५ मध्ये दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले. वाघिणीने बछड्यांना सोडून दिल्याने भुकेने बछड्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पावनी एकसंघ बफर क्षेत्रात वनाधिकाऱ्यांना २७ आणि २८ ऑगस्टच्या रात्री साधारणतः एका महिन्याचे वाघाचे दोन बछडे कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसले. २९ ऑगस्ट रोजी पुन्हा सकाळी पावनी एकसंघच्या खापा संरक्षण कुटी जवळ दोन बछडे दिसले. त्यानंतर ते घनदाट जंगलात गेले. बछड्यांची माहिती घेण्यासाठी परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आणि बछड्यावर लक्ष ठेवण्यासाठी पथके तयार करण्यात आली.

वनाधिकाऱ्यांना रात्री परिसरात वाघाची डरकाळी देखील ऐकू आली. दोन दिवसानंतर ३१ ऑगस्टला शेजारील कक्ष क्रमांक २५५ आणि मायक्रोपहाडी परिसरात एका शावकासह वाघिणीच्या पाऊलखुणा आढळून आल्या. २ सप्टेंबर रोजी कॅमेरा ट्रॅप छायाचित्रांमध्ये टी २४ नावाची वाघीण आढळून आली. रविवारी वनाधिकाऱ्यांना कक्ष क्रमांक २५५ मध्ये दोन बछडे मृतावस्थेत आढळले. मृतदेहाजवळ वाघिणीच्या पाऊलखुणाही आढळून आल्या. रविवारी आणखी एक वाघिणीचा आणि बिबट्याच्या पाऊलखुणा त्याच परिसरात वनाधिकाऱ्यांना दिसून आल्या.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिराच्या लोकार्पणासाठी CM आदित्यनाथ योगी भेटणार PM नरेंद्र मोदींना)

या परिसरात एक नर वाघही आहे. दोन बछड्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच प्रभारी क्षेत्र संचालक व उपसंचालक प्रभू नाथ शुक्ल व इतर संबंधित वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी ह तातडीने घटनास्थळी पोहोचले. वनाधिकाऱ्यांनी शिकारीचा प्राथमिक संशय व्यक्त करत तातडीने परिसराची नाकेबंदी केली. वनाधिकाऱ्यांनी तातडी आजूबाजूच्या परिसराची झडतीही घ्यायला सुरुवात केली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही बछड्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. बछड्यांच्या शरीराचे कोणतेही अवयव गायब नव्हते. मृत्यूचे संशयास्पद कारण नोंदवले गेले नाही. मृत्यूचे अज्ञात कारणाने वाघिणीने बछड्यांना सोडून दिल्याने बछड्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.