Vande Bharat Express : आता लवकरच चीनच्या सीमेपर्यंत धावणार वंदे भारत एक्स्प्रेस

ईशान्य भारतात रेल्वे रुळांचे ६५ टक्के काम पूर्ण

31
Vande Bharat Express : आता लवकरच चीनच्या सीमेपर्यंत धावणार वंदे भारत एक्स्प्रेस

भारताच्या ईशान्य भागात (Vande Bharat Express) सिक्कीम, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार पर्यंतच्या परिसरात नवे रेल्वे रूळ टाकण्याचे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत सिक्कीमच्या रग्पो ते गंगटोक पर्यंत वंदे भारत (Vande Bharat Express) सुरू होईल. त्यानंतर ही रेल्वे चीन सीमेवरील नाथूला पर्यंत नेण्यात येणार असल्याची माहिती ईशान्य रेल्वेने दिली आहे.

अधिक माहितीनुसार नाथूला रेल्वे मार्गाची मंजुरी अंतिम टप्प्यात आली असून लवकरच या प्रस्तावित रेल्वे मार्गाचा (Vande Bharat Express) सर्व्हे सुरू होणार आहे. रंग्पो-गंगटोक मार्गावर सेवक, रियांग, मेली स्टेशन तयार झाले आहेत. तर तिस्ता बाजारात भूमिगत स्टेशन होणार आहे. त्रिपुराला बांगलादेश, आसामला भूतानशी जोडणाऱ्या २ आंतरराष्ट्रीय सीमा रेल्वेमार्गाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. आणखी ३ रेल्वे प्रकल्प प्रस्तावित असून या माध्यमातून भारताला सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिराच्या लोकार्पणासाठी CM आदित्यनाथ योगी भेटणार PM नरेंद्र मोदींना)

यासोबतच आंतरराष्ट्रीय सीमापार रेल्वे प्रकल्पांतर्गत (Vande Bharat Express) त्रिपुराची राजधानी आगरतला ते बांगलादेशातील अखौरा रेल्वेस्थानक जोडले जाणार आहे. एकूण ८६२ कोटींच्या प्रकल्पात भारताचा ५ आणि बांगलादेशचा १० किलोमीटरचा भाग येतो. याठिकाणी जून-२०२४ मध्ये पहिली चाचणी होईल. तर डिसेंबरपर्यंत रेल्वेमार्ग सुरू होईल. त्यामुळे आगरतला ते ढाका व कोलकाता येथे जाण्यास ६ तास लागतील. तसेच मणिपूरच्या इम्फाल ते मोरेहपर्यंत रेल्वे रूळ टाकले जात आहेत. मोरेह हे म्यानमार सीमेवरील भारताचे शेवटचे क्षेत्र आहे.

हेही पहा –  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.