Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा जीआर निघाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही – मनोज जरांडे पाटील यांचा इशारा

सरकारकडे अजून एक दिवस आहे. उद्या निर्णय झाला नाही तर आम्ही सर्वजण बसून आंदोलनाची पुढील दिशा ठरवू.

99
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा जीआर निघाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही - मनोज जरांडे पाटील यांचा इशारा
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा जीआर निघाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही - मनोज जरांडे पाटील यांचा इशारा

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. मात्र आम्हाला खात्री आहे की, सरकारचे शिष्टमंडळ हे जीआर घेऊनच आमच्याकडे येईल. सरकारकडे अजून एक दिवस आहे. उद्या निर्णय झाला नाही तर आम्ही सर्वजण बसून आंदोलनाची पुढील दिशा ठरCMवू. अन्यथा अन्यथा उद्या पासून पाणीही सोडेन, असा इशारा मनोज जरांडे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगत उपोषण मागे घेण्याची विनंती त्यांनी केली. मात्र, मराठा आरक्षणाचा जीआर निघाल्याशिवाय उपोषण मागे घेण्यास जरांगे पाटील यांनी नकार दिला. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

(हेही वाचा : Jalna Maratha Agitation : जालना प्रकरणात गुप्तचर यंत्रणा गाफील कशी राहिली?)

अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना आपले उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. तसेच, मराठा आरक्षणासाठी नेमलेलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला येण्याचे आवाहन केले. अर्जुन खोतकर यांनी सांगितले, मराठा आरक्षणाचा जीआर कोर्टात टिकावा अशा पद्धतीने काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, त्याआधी परिपूर्ण चर्चा होण्याची आवश्यकता आहे. जरांगे पाटील यांनी आता उपोषण मागे घेऊन चर्चेची दारे उघडी करावीत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.