Direct Tax Collection : १० ऑगस्टपर्यंत सरकारी तिजोरीत साडेसहा लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर जमा

Direct Tax Collection :

80
Direct Tax Collection : १० ऑगस्टपर्यंत सरकारी तिजोरीत साडेसहा लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर जमा

केंद्रसरकारच्या प्रत्यक्ष कर संकलनात १० ऑगस्टपर्यंत विक्रमी वाढ झाली आहे. आतापर्यंत सरकारी तिजोरीत ६.५३ लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर Direct tax collection जमा झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीतील कर संकलनाच्या तुलनेत हे प्रमाण १५.७३ टक्क्यांनी जास्त आहे.

प्रत्यक्ष कर Direct tax म्हणजे जो कर करदाता प्रत्यक्षपणे सरकारी तिजोरीत जमा करतो, तो कर. आपल्या उत्पन्नावर आपण भरत असलेला आयकर हा प्रत्यक्ष करांमध्ये गणला जातो. कारण, आपल्या मिळकतीवर एकतर TDS कापला जातो किंवा आपणही आगाऊ कराच्या रुपातून थेट आयकर जमा करत असतो. आयकर विभागाने आज ट्विट करत कर संकलनाविषयीची महत्त्वाची माहिती उघड केली आहे.

यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी आयकर विभागाने आतापर्यंत ६९,००० कोटी रुपयांचा परतावा (refund) देऊ केला आहे. ही रक्कम वजा केली तरी निव्वळ कर संकलन हे ५.८४ लाख कोटी रुपयांचं आहे. हे प्रमाणही गेल्यावर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी जास्त आहे.
२०२३-२४ या चालू आर्थिक वर्षात कर संकलनाचा जो सरकारी अंदाज आहे त्याच्या ३२% रक्कम सरकारी तिजोरीत एव्हाना जमा झाली आहे, असंही आयकर विभागाने या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केलं आहे.
आकडेवारीत झालेली ही सुधारणा आधीच्या तुलनेत जास्त आयकर विवरणपत्र भरली गेल्यामुळे झाली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी आयकर विभागाकडे एकूण ६.७७ कोटी विवरणपत्र दाखल झाली. म्हणजे आधीच्या तुलनेत जवळ जवळ एक कोटी जास्त. यातले ५३.६७ लाख करदाते हे पहिल्यांदाच विवरणपत्र भरत होते. ३१ जुलै या शेवटच्या तारखेला ६४ लाखांहून जास्त विवरणपत्र दाखल झाली

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.