Illegal Banners Action : बॅनर लावणाऱ्यांवर पोलिसांची नजर, बॅनर लावताना सापडल्यास होऊ शकते कारवाई

बेकायदेशीररित्या बॅनरबाजी करून शहराचे विद्रुपीकरणं करणाऱ्यावर लक्ष ठेवण्याची विनंती मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई पोलिसांनी करण्यात आली आहे.

52
Lok Sabha Election 2024 : मुंबईतील सर्व होर्डिंग, पोस्टर, बॅनर तत्काळ हटवावे; चहल यांचे निर्देश

बेकायदेशीररित्या बॅनरबाजी करून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची विनंती मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई पोलिसांनी करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना पत्र पाठवून रात्रीच्या वेळी जागरूक राहण्याची विनंती मुंबई महानगरपालिकेने केली आहे. बेकायदेशीर बॅनरबाजी प्रकरणी मुंबई पोलीसांकडे एकूण ३७८ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (Illegal Banners Action)

मुंबई महानगरपालिकेने बेकायदेशीर बॅनरबाजी करणाऱ्यांविरोधात कडक पाऊले उचलली आहे. हे बॅनरबाज बेकायदेशीररित्या बॅनरबाजी करून शहराचे विद्रुपीकरण करीत आहेत. उत्सव, सणाचे दिवस सुरू झाल्यामुळे बॅनरबाजीला देखील ऊत आला आहे. गल्ली बोळातील कार्यकर्ते आणि स्वयंघोषित पुढाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण करीत आहे. या बेकायदेशीर बॅनरबाजांना आळा घालण्यासाठी महानगरपालिकेने बॅनरबाजांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यास सुरू केले आहे. तसेच शहरातील बेकायदेशीर बॅनर काढण्याची मोहीम मनपाने हाती घेतली आहे. (Illegal Banners Action)

जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत ३३ हजार ७४२ बेकायदेशीर बॅनर आणि पोस्टर्स महापालिकेकडून काढण्यात आले आहेत. ही आकडेवारी मागील वर्षी केलेल्या कारवाईच्या दुप्पट आहे असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. मनपाने यंदाच्या वर्षी मागील दहा महिन्यात बेकायदेशीर बॅनरबाजींचे संबंधित पोलीस ठाण्यामध्ये ३७८ प्रकरणे नोंदवली आहे, तर केवळ १७ गुन्हे दाखल केले आहेत. मनपा अधिकाऱ्यांनी नुकतेच मुंबई पोलिसांना पत्र पाठवून बेकायदेशीर बॅनरमुळे शहराचे होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी विशेषत: रात्रीच्या वेळी जागरुक राहण्याची विनंती केली आहे. मनपाने मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर २०२२ दरम्यान १६.३६० बेकायदेशीर बॅनर्स आणि पोस्टर्स काढले आहेत. (Illegal Banners Action)

(हेही वाचा – S Jaishankar : वेगळा पॅलेस्टिनी देश निर्माण करणे आवश्यक – एस जयशंकर)

बॅनर आणि पोस्टर्समुळे यावर्षीही शहराची विटंबना होताना दिसली. याची गंभीर दखल घेत शासनाकडून बेकायदा बॅनरवर कारवाई करण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे, मनपाने गेल्या काही महिन्यांत विशेषत: सणासुदीनंतर वारंवार विशेष मोहीम राबवली आहे. सप्टेंबरमध्ये सर्वाधिक ९.८०२ तर ऑक्टोबरमध्ये ८,२२६ बेकायदा बॅनर हटवण्यात आले. मनपाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, १९.५८० बॅनर धार्मिक स्वरूपाचे होते, ११,०४० राजकीय आणि ३,१२१ व्यावसायिक होते. शहरातील अनेक भागांतून सुमारे २,८८९ राजकीय पक्षांचे झेंडेही हटवण्यात आले. कांदिवली, अंधेरी, सांताक्रूझ, वांद्रे आणि भांडुप या प्रमुख ठिकाणी सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. (Illegal Banners Action)

तथापि, ८०१ प्रकरणांमध्ये खटला सुरू करण्यात आला. ३७८ प्रकरणे पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आणि १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी मुख्य ठिकाणी बॅनर लावले जातात. मनपा कर्मचारी कारवाई करण्यासाठी गेल्यावर त्यांच्यावर हल्ले होत असल्यामुळे त्यांना राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आम्ही पोलिस आयुक्तांना रात्रीची गस्त वाढवून अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी पत्र लिहिले आहे, असे एका वरिष्ठ मनपा अधिकाऱ्याने सांगितले. (Illegal Banners Action)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.