Holidayचा प्लॅन करताय Indore सर्वोत्तम; जाणून घ्या कोणती आहेत आकर्षक ठिकाणे?

70

Indore ला काही जण ‘भारताची स्ट्रीट फूड कॅपिटल’ म्हणतात, तर काही जण याला ‘मिनी मुंबई’ म्हणतात, कारण या शहराशी इंदूर शहरासोबत बरेच साम्य आहे. इंदूर शहर, मध्य भारतातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. हे  शहर त्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी, प्रतिष्ठित स्मारकांसाठी प्रसिद्ध आहे. जर यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत कुठे जायचे आहे, हे तुम्ही ठरवत असाल तर इंदूर सर्वोत्तम पर्याय आहे. या ठिकाणी कुठे जायचे आहे? कोणत्या ठिकाणी भेट द्यावी? हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, त्यामुळे इंदूरमधील 7 आवश्‍यक असलेल्या ठिकाणांची यादी नक्की तुम्हाला फायदेशीर ठरेल.

राजवाडा

rajwada

२ शतकांपूर्वी बांधलेला Indore चा राजवाडा हे होळकर घराण्याचे मुख्य निवासस्थान होते. या ठिकाणी एक कृत्रिम धबधबा, महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा भव्य पुतळा, सुस्थितीत असलेली बाग आणि मोहक कारंजे आहेत.
कुठे आहे राजवाडा ? – एम.जी. रोड, छत्रीस, मुख्य चौक, इंदूर

  • कधी प्रवेश मिळतो? –  सकाळी 10 ते  संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. (सोमवारी बंद)
  • प्रवेश शुल्क किती?  – भारतीय नागरिक: 10 रुपये, परदेशी नागरिक २५० रुपये.

सराफा बाजार

sarafa bazar

तुम्ही खाण्याचे शौकीन नसले तरीही, तुम्ही Indore च्या सराफा बाजारात पाऊल टाकताच तुम्हाला पेटपूजा करण्याची जबरदस्त इच्छा होईल. सूर्यास्तानंतर दागिन्यांचा बाजार हा खवय्यांचा बाजारात रूपांतरित होतो. मोठ्या संख्येने लोक येथे विविध पदार्थांची चव चाखण्यासाठी रांगा लावतात. मक्याचा किस, मुगाचे भजी ते दही वडा आणि जलेबी तुम्हाला आकर्षित करू शकते.

  • कुठे आहे सराफ बाजार? – राजवाडा, महाराजा तुकोजी राव होळकर क्लॉथ मार्केट, इंदूर
  • केव्हा सुरु होतो? – सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत.

(हेही वाचा Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या स्थगितीने छोट्या व्यापाऱ्यांची दिवाळी होणार गोड)

छप्पन दुकन

chhapan bazar

Indore मधील खाद्यपदार्थांसाठी आवश्‍यक असलेले आणखी एक ठिकाण छप्पन दुकन. येथे भारतीय स्नॅक्स आणि इतर रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे मिश्रण आहे. रमेश मसाला डोसा आणि जॉनी हॉट डॉग्सपासून सॅमचे मोमोज आणि यंग तरंग येथे चाटसह स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागणार आहे.

  • कुठे आहे छप्पन दुकान? –  न्यू पलासिया, इंदूर
  • केव्हा प्रवेश मिळतो? – सकाळी 06:00 ते रात्री 10:00 वाजता.

राळामंडल वन्यजीव अभयारण्य

ralnala

तुमच्यासाठी वन्यजीव आवडीचे असतील तर Indore च्या राळामंडल वन्यजीव अभयारण्यात बिबट्या, काळवीट, सांभर, निळा बैल आणि भेडकी तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच निलगिरी, साग, चंदन, सजा, बाबुल बांबू आणि बरेच काही यासारख्या विविध प्रकारचे वृक्ष तुम्हाला पाहायला मिळतात. त्या व्यतिरिक्त, अभयारण्य अत्यंत नयनरम्य आहे आणि भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ सप्टेंबर ते मार्च दरम्यान आहे.
कुठे आहे राळामंडल ? –  राळामंडल, इंदूर, मध्य प्रदेश

  • केव्हा प्रवेश मिळतो? – सकाळी 09:00 ते संध्याकाळी 06:30 वाजता.
  • दिवसाची वेळ ( सकाळी 07:30 AM ते संध्याकाळी 05:00 PM)
  • प्रवेश शुल्क – 60 रु.
  • रात्रीची वेळ ( रात्री 07:30 ते रात्री 09:00 वाजता)
  • प्रवेश शुल्क – १२ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी २०० रुपये)
  • ५ ते १२ वर्षांच्या नागरिकांसाठी १०० रुपये)
  • ५ वर्षापर्यंत मोफत

मेघदूत गार्डन

meghdut

Indore मधील सर्वात मोठ्या आणि निश्चितपणे सर्वात जुन्या बागांपैकी एक मेघदूत गार्डन. एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे. हे प्रशस्त आणि आनंददायी हिरवळीने भरलेले आहे, ज्यामुळे सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तसेच, जवळपास अनेक खाद्य दुकाने आणि खरेदी केंद्रे आहेत.

  • कुठे आहे  मेघदूत गार्डन? – मेन गेट, प्रवेशद्वार, मागुदा नगर, स्कीम नंबर 54, इंदूर
  • केव्हा प्रवेश मिळतो? – सकाळी 07:00 ते रात्री 10:00 PM
  • प्रवेश कुणाला मिळतो? – भारतीय नागरिक 10 रुपये, परदेशी नागरिक 200 रुपये

केंद्रीय संग्रहालय

central meseaum

होळकर घराण्याने 1925 मध्ये स्थापन केलेले Indore मधील सेंट्रल म्युझियम जर तुमच्यामध्ये इतिहासाची थोडीफार माहिती असेल तर अवश्य भेट द्यावी. या ठिकाणी प्राचीन धर्मग्रंथ, नाणी आणि कलाकृती प्रदर्शित करणार्‍या आठ गॅलरी आहेत, ज्या तुम्हाला होळकर घराण्याच्या भूतकाळातील इतिहास आणि शहराच्या समृद्ध सांस्कृतिक वारशातून खाली घेऊन जातील.

  • कुठे आहे केंद्रीय संग्रहालय? – जीपीओ स्क्वेअर जवळ, रेसिडेन्सी, नवलाखा, इंदूर
  • केव्हा प्रवेश मिळतो? – सकाळी 10  ते संध्याकाळी 05:00 वाजता. (सोमवार बंद)
  • प्रवेश शुल्क – भारतीय नागरिक 10 रुपये, परदेशी नागरिक 100 रुपये.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.