Tadoba Jungle Safari: ताडोबातील वाहने बॅटरीवर धावणार, पर्यटकांना घेता येणार जंगलातील प्राण्यांच्या आवाजाचा आनंद

868
Tadoba Jungle Safari: ताडोबातील वाहने बॅटरीवर धावणार, पर्यटकांना घेता येणार जंगलातील प्राण्यांच्या आवाजाचा आनंद
Tadoba Jungle Safari: ताडोबातील वाहने बॅटरीवर धावणार, पर्यटकांना घेता येणार जंगलातील प्राण्यांच्या आवाजाचा आनंद

वाघ आणि इतर वन्यप्राण्यांना त्रास होऊ नये यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र (Tadoba Jungle Safari) प्रकल्पात (Tadoba-Andhari Tiger Reserve)आता लवकरच जंगल सफारीसाठी विद्युत वाहने वापरली जाणार आहेत. यामुळे पर्यटकांना वाघाची डरकाळी आणि जंगलातील इतर प्राण्यांच्या आवाजांचा आनंद घेता येईल तसेच पर्यटकांना प्राण्यांना जवळून अनुभवणेही शक्य होणार आहे.

याकरिता व्याघ्र प्रकल्पातील पर्यटक वाहनांपैकी ४ जुन्या वाहनांचे रुपांतर पेट्रोलवरून बॅटरीवर करण्यात आले आहे. सफारी वाहनांच्या इंजिनाच्या आवाजाने जंगली प्राणी विचलित होतात. त्यामुळे पर्यावरणपूरक सफारीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा आर्थिकदृष्ट्याही फायदा होणार आहे, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रत्येक वाहनात सहा पर्यटक असतात. वाघांच्या दर्शनासाठी राखीव क्षेत्राच्या बफर आणि कोअर झोनमध्ये दररोज २ फेऱ्या होतात, अशी माहितीही त्यांनी दिली.

(हेही वाचा – Supriya Sule यांचा बारामतीत मुक्काम; रुपाली चाकणकर म्हणाल्या, ”अजित पवार सोबत नसल्याने…” )

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी सांगितले की, आम्ही आधी आमचे वाहन विद्युत वाहनात रुपांतरित केले आणि नंतर तीन महिन्यांपर्यंत त्याची चाचणी घेण्यात आली. येथील ४ जिप्सींचे बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांमध्ये रुपांतर करण्यात आले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पर्यटकांना नेण्यास सुरुवात केली. याविषयी त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत वैधानिक प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असलेल्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) या संबंधात व्याघ्र प्रकल्पातील उत्सर्जन कमी करण्यासाठी बॅटरीवर चालणारी वाहने चालवण्याचा प्रस्ताव होता.

पर्यटक आता ई-जिप्सीला प्राधान्य देतात…

पेट्रोल भरण्यासाठी ताशी ३० किमी दूर असलेल्या चंद्रपूरला जाण्याची गरज नाही. विद्युतीकरणामुळे जिप्सीवरील पर्यटक मार्गदर्शकाशी संवाद साधू शकतात आणि कोणत्याही इंजिनाच्या आवाजाच्या व्यत्ययाशिवाय निसर्गातील आवाज कानात साचवून ठेवण्याचा आनंद घेता येईल. पेट्रोलवरील वाहनांच्या आवाजामुळे प्राणी पळून जातात. पर्यटक आता ई-जिप्सीला प्राधान्य देतात आणि त्यांना फिरण्यासाठी अशा वाहनांची मागणी करतात, अशी माहिती वाचनचालक सादिक बेग यांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.