USD 100-Billion Net Worth : १०० अब्ज अमेरिकन डॉलरचा उद्योग समुह चालवणारी ‘ही’ महिला कोण आहे

फ्रान्समधील फ्रँकॉईज बेटनकोर्ट मेयर्स या १०० अब्ज अमेरिकन डॉलर क्लबमधील एकमेव महिला आहेत. 

192
USD 100-Billion Net Worth : १०० अब्ज अमेरिकन डॉलरचा उद्योग समुह चालवणारी 'ही' महिला कोण आहे
USD 100-Billion Net Worth : १०० अब्ज अमेरिकन डॉलरचा उद्योग समुह चालवणारी 'ही' महिला कोण आहे
  • ऋजुता लुकतुके

फ्रान्समधील फ्रँकॉईज बेटनकोर्ट मेयर्स या १०० अब्ज अमेरिकन डॉलर क्लबमधील एकमेव महिला आहेत. (USD 100-Billion Net Worth)

पॅरिस हे कलासक्त लोकांचं शहर मानलं जातं. आणि तिथे कला तसंच अत्तर, वाईन तसंच इतरही उंची वस्तूंचे दर्दी, उच्च अभिरुची असलेले लोक राहतात, असं या शहराबद्दल बोललं जातं. म्हणूनच तिथं सौंदर्य प्रसाधनांचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. शहराची ही ओळख खरी ठरवणारी एक घडामोड अलीकडेच शहरात घडली आहे. या देशातील सौंदर्य प्रसाधनं आणि शांपू बनवणारी आघाडी कंपनी लॉरियल पॅरिस या कंपनीचे शेअर देशांतर्गत शेअर बाजारात इतके वर गेले आहेत की, कंपनीची मालक फ्रँकॉईज बेटनकोर्ट मेयर्स यांची मालमत्ता चक्क १०० अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे. (USD 100-Billion Net Worth)

आणि या क्लबमधील त्या एकमेव आणि पहिल्या महिला ठरल्या आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीने त्यांची एकूण मालमत्ता १००.१ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचल्याचं मागच्या आठवड्यात प्रसिद्ध केलं. लॉरियल एसए ही कंपनी खरंतर त्यांच्या आजोबांनी स्थापन केली. पण, बेटनकोर्ट यांनी तिचा विस्तार केला. आणि आता ही कंपनी १९९८ नंतरची शेअर बाजारातील सर्वोत्तम कामगिरी करतेय. (USD 100-Billion Net Worth)

(हेही वाचा – Rammandir Pran Pratishtha : गर्भगृहात विराजमान होणार 51 इंचांची उभी मूर्ती)

बेटनकोर्ट मेयर्स आता जगातील बाराव्या श्रीमंत व्यक्ती ठरल्या आहेत. फ्रान्समधील उंची वस्तू बनवणाऱ्या कंपन्या जागतिक स्तरावर चांगली कामगिरी करत आहेत. कारण, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत बर्नार्ड आरनॉल्ड हे लुई व्हितॉ हा जागतिक ब्रँड चालवतात. त्यांची संपत्ती १७९ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. (USD 100-Billion Net Worth)

फ्रँकॉईज बेटनकोर्ट मेयर्स या ७० वर्षांच्या आहेत. आणि लॉरियल कंपनीच्या संचालक मंडळावर उपाध्यक्ष आहेत. फ्रँकॉईज आणि त्यांचे दोन मुलगे यांच्याकडे मिळून लॉरियल कंपनीची ३५ टक्के हिस्सेदारी आहे. विशेष म्हणजे फ्रँकॉईज यांचे आजोबा युजिन शुलर यांनी १९०८ मध्ये त्यांनी बनवलेला हेअर डाय बनवण्यासाठी ही कंपनी स्थापन केली होती. तिचा आता इतका मोठा जागतिक विस्तार झाला आहे. (USD 100-Billion Net Worth)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.