Dr. Ashwini Joshi यांच्या बदलीला स्थगिती

164
Dr. Ashwini Joshi during a meeting.
Dr. Ashwini Joshi यांच्या बदलीला स्थगिती
  • प्रतिनिधी

Dr. Ashwini Joshi        मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी डॉ. जोशी यांच्या बदलीचा स्थगिती आदेश जारी केला. १६ जूनच्या पत्रान्वये बदलीचे आदेश पुढील आदेश होईपर्यंत स्थगित ठेवण्यात येत असल्याचे विभागाने आपल्या आदेशात म्हटले आहे. (Dr. Ashwini Joshi)

(हेही वाचा – सामाजिक, राजकीय आंदोलनातील ४४ खटले मागे; मंत्री Ashish Shelar यांची माहिती)

सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते. बदल्यांच्या यादीत डॉ. जोशी यांचा समावेश होता. त्यांची बदली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी करण्यात आली होती. डॉ. जोशी यांच्या जागी प्राजक्ता वर्मा यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला होता. मात्र, सरकारने रातोरात डॉ. अश्विनी जोशी यांच्या बदलीला स्थागिती देण्याचा निर्णय घेतला. (Dr. Ashwini Joshi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.