Aanganewadi : कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेला सुरुवात; मुख्यमंत्र्यांनीही घेतले दर्शन

165

कोकणातील (Konkan)  प्रसिद्ध आंगणेवाडीच्या (Aanganewadi)  भराडी देवीची (Bharadi Devi)  यात्रेला शनिवार, 2 मार्चपासून सुरु झाली. पहिल्याच दिवशी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यात्रेच्या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी देवीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी कोकणच्या विकासासाठी आश्वासने दिली. तसेच राज्याच्या जनतेला, शेतकऱ्यांची भरभराटी व्हावी, राज्यात पाऊस चांगला व्हावा असे साकडे घातले. यावेळी त्यांच्या सोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत होते.

कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रा

भराडी देवीच्या जत्रेची तारीख देवीचा कौल घेऊन ठरवली जाते. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव ‘भराडी देवी’ असे ठेवण्यात आले. भराड म्हणजे माळरान. या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरान आहे, म्हणूनच या देवीला भराडी देवी असे म्हटले जाते. मोठ्या उत्साहात आंगणेवाडीच्या (Aanganewadi) भराडी देवी यात्रा होते, यात भाविकांसह राजकीय नेते मंडळी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असतात.

(हेही वाचा Bombay High Court च्या आदेशामुळे निवडणूक कामापासून धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुटका)

देश-परदेशात भराडी देवीच्या यात्रेचं आकर्षण

दक्षिण कोकणची काशी आंगणेवाडीतील  (Aanganewadi) भराडीदेवीच्या यात्रेचे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश-परदेशात आकर्षण पाहायला मिळते. दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या उत्साहात ही यात्रा पार पडते. यंदाही मोठ्या संख्येने भाविक आंगणेवाडीमध्ये दाखल झाले आहेत. भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असतात.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.