Mum vs TN Ranji SF : तामिळनाडूच्या संघाला प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णीकडून काय टीप्स मिळणार?

तामिळनाडू संघाचे प्रशिक्षक आहेत मुंबईकडून खेळलेले आणि मुंबईचं प्रशिक्षकपदही भूषवलेले सुलक्षण कुलकर्णी

115
Mum vs TN Ranji SF : तामिळनाडूच्या संघाला प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णींकडून काय टीप्स मिळणार?
Mum vs TN Ranji SF : तामिळनाडूच्या संघाला प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णींकडून काय टीप्स मिळणार?
  • ऋजुता लुकतुके

यंदाच्या रणजी हंगामातील पहिला उपान्त्य फेरीचा सामना शनिवारी मुंबई विरुद्ध तामिळनाडू (Mum vs TN Ranji SF) या संघांविरोधात रंगत आहे. या सामन्यापूर्वी तामिळनाडू संघाचा कर्णधार आर साई किशोरने संघांच्या प्रशिक्षकांविषयी आपला विश्वास व्यक्त केला. याला कारणच तसं आहे. कारण, तामिळनाडू संघाचे सध्याचे प्रशिक्षक आहेत सुलक्षण कुलकर्णी, (Sulakshan Kulkarni) जे स्वत: मुंबईकडून खेळले आहेत. आणि मुंबई संघाचे प्रशिक्षकही राहिले आहेत.

त्यामुळे मुंबई क्रिकेट आणि क्रिकेटपटूंना जवळून ओळखणारे सुलक्षण सर खेळाडूंना या सामन्यात काय सल्ला देतात आणि तो प्रत्यक्षात उतरतो का, याकडे तामिळनाडू संघाचंच लक्ष असेल.

२०१४-१५ च्या हंगामानंतर तामिळनाडूचा संघ पहिल्यांदाच उपान्त्य फेरीत पोहोचला आहे. पण, तेव्हा कर्नाटकने त्यांचं विजेतेपदाचं स्वप्न हिरावून घेतलं होतं. यावेळी मुंबईवर मात करून अंतिम फेरीत खेळण्याचा निर्धार तामिळनाडू संघाने केला आहे. आणि त्यासाठी सुलक्षण कुलकर्णींचं (Sulakshan Kulkarni) महत्त्व कर्णधार साई किशोरला कळतंय.

(हेही वाचा – Mum vs Tn Ranji SF : श्रेयस अय्यरच्या समावेशामुळे मुंबईचा कर्णधार रहाणे खुश)

‘सुलु सर हा विलक्षण माणूस आहे. त्यांची शिस्त कडवी आहे. आणि मैदानावर दोन्ही संघांकडे त्याचं लक्ष असतं. त्यांनी ऐनवेळी दिलेला एखादा सल्ला गोलंदाज किंवा फलंदाजाला नेमका उपयोगी पडतो. त्यामुळे मुंबई विरुद्धही आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवून आहोत,’ असं तामिनाडूचा कर्णधार मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाला.

दुसरीकडे, सुलक्षण कुलकर्णी (Sulakshan Kulkarni) यांचीही नजर रणजी करंडकावर आहे. ‘मागच्या १५ वर्षांत तामिळनाडू संघ ३-४ दा बाद फेरीत पोहोचला. आर अश्विन, मुरली कार्तिक यांच्या सारखे खेळाडूने संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दिले. आता वेळ आली आहे ती करंडक हातात घेण्याची. संघात गुणी खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे हे कठीण नाही. पण, त्यासाठी प्रत्येकाने मैदानात योगदान द्यायला हवं. आणि ते ही होईल,’ असं सुलक्षण कुलकर्णी (Sulakshan Kulkarni) म्हणाले.

मुंबई विरुद्ध संघाचा भरवसा हा कर्णधार साई किशोरवर असणार आहे. या हंगामात साई किशोरने डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीवर तब्बल ४७ बळी मिळवले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.