ST BUS Accident : चाक निखळले, एसटी उलटली, मात्र नशीब बलवत्तर म्हणून प्रवासी वाचले

अपघातामध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

106
ST BUS Accident : चाक निखळले, एसटी उलटली, मात्र नशीब बलवत्तर म्हणून प्रवासी वाचले
ST BUS Accident : चाक निखळले, एसटी उलटली, मात्र नशीब बलवत्तर म्हणून प्रवासी वाचले

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरुन धावणाऱ्या एसटी बसला (ST Bus) अपघात झाला आहे. या एसटी बसचे मागचे चाकं निखळले. मात्र नशिब बल्वत्तर म्हणून या बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले आहे. रविवारी (२६ नोव्हेंबर) सकाळी हा अपघात घडला. या अपघातामध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी आहेत. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. (ST BUS Accident )

सोलापूरहून येथून ही एसटी बस नांदेडकडे निघाली होती. या बसमधून किती प्रवासी प्रवास करत होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सोलापुरातील उळे-कासेगाव येथे अचानक एसटी बसचा जॉईंट तुटून चाक निखळल्याने हा अपघात झाला.तर सोलापूर डेपोतून बस बाहेर पडल्यानंतर 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर हा अपघात झाला आहे. (ST BUS Accident )

(हेही वाचा :Indigo Airlines: कोल्हापूर-तिरुपती थेट विमानसेवा होणार बंद; ‘इंडिगो’ची माहिती)

ही बस तिरकी होऊन रस्त्यावरच एसटी बस पलटी झाली. अपघातामध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.सर्व जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. बस थांबल्यानंतर सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, या घटनेमुळे राज्य परिवहन महमंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.