SSC Result : जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची (SSC Result) लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत झाली.

106
JEE Advanced 2023 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पहा निकाल

दहावीच्या (SSC Result) निकालासंदर्भात विविध तारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहान बोर्डाकडून केलं गेलं.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवार २५ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता दहावीच्या निकालाकडे (SSC Result) सर्वांचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar Jayanti 2023 : …म्हणून नेहरूंनी सावरकरांवर गांधी हत्येचा खोटा आरोप केला – रणजित सावरकर)

दहावीचा निकाल (SSC Result) कधी लागणार याची उत्सुकता सर्व विद्यार्थी आणि पालकांना आहे. दहावी परीक्षेच्या निकालाच्या तारखेसंदर्भात बोर्डाकडून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

यंदा 16 लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची (SSC Result) लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत झाली. यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.