Ravindra Chavan : २७ गावांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न लवकर मार्गी लावा; रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

२७ गावांच्या परिसरातील सध्याच्या अस्तित्वातील नळजोडण्याचा व्यास दुप्पट करणे, बुस्टरपंप बसविणे यांसह दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्यासंदर्भातही आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

71
Ravindra Chavan : २७ गावांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न लवकर मार्गी लावा; रवींद्र चव्हाण यांचे निर्देश
Ravindra Chavan : २७ गावांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न लवकर मार्गी लावा; रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांच्या पाणी पुरवठा प्रश्नासंदर्भात, तसेच डोंबिवलीमधील विविध नागरी समस्यांच्या पाणी पुरवठाचा प्रश्न तातडीने आणि कायमस्वरुपी सोडवण्याच्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसाठी स्वतंत्र एसटीपी प्लॅट तातडीने उभारण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश सार्वनजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी सोमवारी (३० ऑक्टोबर) एमआयडीसीला दिले. (Ravindra Chavan)

कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांच्या पाणी पुरवठा प्रश्नांसदर्भात तसेच डोंबिवलीमधील विविध नागरी समस्यांच्या विषयांच्या अनुषंगाने आज रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा यांच्यासह कल्याण-डोंबिवलीतील २७ गाव संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. (Ravindra Chavan)

२७ गावांच्या परिसरातील सध्याच्या अस्तित्वातील नळजोडण्याचा व्यास दुप्पट करणे, बुस्टरपंप बसविणे यांसह दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्यासंदर्भातही आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याअनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना रवींद्र चव्हाण यांनी सूचना दिल्या. (Ravindra Chavan)

(हेही वाचा – Israel-Hamas Conflict: हमासने ओलीस ठेवलेल्या ३ महिलांचा व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल)

एमआयडीसीच्या मार्फत सध्या सदर २७ गावांना ४८ टॅपिंगद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. अमृत योजनेतंर्गत संदप, नांदीवली टेकडी येथे बांधण्यात येणारे जलकुंभल तातडीने सुरु करुन या योजनेचा लाभ २७ गावातील नागरिकांना देण्यात यावा. तसेच महानगरपालिका क्षेत्रात सुरु असलेल्या अमृत १.० योजनेचे काळे, हेदुटणे, नेवाळी, निळजे येथील टॅपींगला मंजुरी देण्याच्या प्रस्तावावर लवकर कार्यवाही करावी, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. मानपाडा येथे असलेल्या प्रेशर गेजरील पाण्याचा दाब हा कायम ठेवावा जेणेकरून डोंबिवलीत २७ गावांना तसेच डोंबिवलीकरांना पाण्याचा पुरवठा अधिक सक्षमपणे होऊ शकेल असेही त्यांनी सांगितले. (Ravindra Chavan)

पलावा सिटी कर आकारणीच्या विषयासंदर्भात आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. एकत्रित विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावतील तरतुदीनुसार अग्निशमन यंत्रणा आदीसह अन्य पायाभूत सुविधा महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात यावी. जेणेकरून येथील रहिवाश्यांना मालमत्ता कर आणि अन्य करांमध्ये नियमानुसार सवलत मिळू शकेल. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास याचा लाभ येथील सुमारे ६० ते ७० हजार लोकांना होऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे निर्देशही रवींद्र चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (Ravindra Chavan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.