Maratha Reservation : बीडमध्ये मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी भवन पेटवले; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

आता बीडमध्ये आंदोलनाचे लोण पसरले आहे. बीडमधील मुख्य बाजारपेठेत मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी भवन जाळल्याने वातावरण संतप्त झाले आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालयही संतप्त आंदोलकांकडून पेटवण्यात आले आहे.

55
Maratha Reservation : बीडमध्ये मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी भवन पेटवले; संचारबंदी लागू
Maratha Reservation : बीडमध्ये मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी भवन पेटवले; संचारबंदी लागू

गेल्या काही दिवसांपासून शांततेत सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. (Maratha Reservation) या आंदोलनाचा सर्वाधिक फटका बीडमधील राजकीय नेत्यांना बसला आहे. या ठिकाणी सकाळी माजलगाव येथील आमदार प्रकाश सोळुंके यांच्या निवासस्थानी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती. माजलगाव येथील नगर परिषदेलाही आग लावण्यात आली. (Maratha Reservation)

त्यानंतर आता बीडमध्ये आंदोलनाचे लोण पसरले आहे. बीडमधील मुख्य बाजारपेठेत मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी भवन जाळल्याने वातावरण संतप्त झाले आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालयही संतप्त आंदोलकांकडून पेटवण्यात आले आहे. बीडमधील शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनाही आंदोलनाचा फटका बसला आहे. या ठिकाणी मराठा आंदोलकांनी संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानी जाळपोळ केली आहे. या ठिकाणी क्षीरसागर यांची ४ ते ५ वाहने संतप्त आंदोलकांनी पेटवून दिली आहेत. त्यामुळे बीडमध्ये आंदोलनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Maratha Reservation)

(हेही वाचा – BMC : मालमत्ता कर विभागाच्या पावणे दोन कोटींच्या खर्चाचा हिशोब लागेना)

दगडफेकही मोठ्या प्रमाणात चालू आहे. बीडमधील हिंसक आंदोलन पाहता प्रशासनाने बीड शहरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न शहरात निर्माण झाला आहे. बीडमध्ये राजकीय नेत्यांची घरे, कार्यालये, आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. आंदोलन आणखी उग्र होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. संध्याकाळी ५ वाजल्यापासून आंदोलन आक्रमक करण्यात आले आहे. जाळपोळीचे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरू नयेत, यासाठी इंटरनेट सेवाही खंडीत करण्यात आली आहे. (Maratha Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.