BMC : कूपर रुग्‍णालयामध्‍ये मिळणार पिवळ्या तापाची लस; लसीकरण केंद्राचे झाले लोकार्पण

27
BMC : कूपर रुग्‍णालयामध्‍ये मिळणार पिवळ्या तापाची लस; लसीकरण केंद्राचे झाले लोकार्पण
BMC : कूपर रुग्‍णालयामध्‍ये मिळणार पिवळ्या तापाची लस; लसीकरण केंद्राचे झाले लोकार्पण

आफ्रिकन देशात जाणाऱ्या भारतीयांना पिवळ्या तापाची लागण होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्या नियमानुसार पिवळ्या तापाची प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक असते. (BMC) महाराष्ट्रातूनही प्रतिवर्षी आफ्रिकन देशांमध्ये जाणाऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेच्या जुहू विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रूस्तम नरसी कूपर रुग्‍णालयामध्‍ये पिवळ्या तापाचे (पिवळा ज्वर) लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पडला. (BMC)

मुंबई महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रूस्तम नरसी कूपर रुग्‍णालयामध्‍ये मौखिक पोलिओ लसीकरण आणि पिवळ्या तापाच्या (पिवळा ज्वर) लसीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा मुंबई विमानतळाचे आरोग्य अधिकारी डॉ. अच्छेलाल पासी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी ३० ऑक्टोबर २०२३ पार पडला. आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत या केंद्रात पोलिओ आणि पिवळ्या तापाची लस संबंधित लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असेल. (BMC)

(हेही वाचा – Ravindra Chavan : २७ गावांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न लवकर मार्गी लावा; रवींद्र चव्हाण यांचे निर्देश)

कूपर रुग्णालयाच्या औषधशास्त्र विभाग अंतर्गत हे लसीकरण केंद्र कार्यान्वित असेल. आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत या केंद्रात लाभार्थींना लस उपलब्ध असेल. पिवळ्या तापाच्या (पिवळा ज्वर) लसीकरणासाठी प्रति लाभार्थी ३०० रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर पोलिओचे लसीकरण पूर्णपणे मोफत असेल. पिवळ्या तापाच्या लसीकरणासाठी येताना लाभार्थ्याला त्याचे पारपत्र (पासपोर्ट) सोबत असणे गरजेचे आहे. (BMC)

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या सुचनेनुसार, त्याचप्रमाणे उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रूस्तम नरसी कूपर रुग्‍णालयामध्‍ये पिवळ्या तापाचे लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. केंद्र शासनानेही या लसीकरण केंद्रासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व परवानग्या दिल्या आहेत.

या सोहळ्याला रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र केंभावी, डॉ. स्मिता चव्हाण, डॉ. संजय पांचाळ, डॉ. प्रसाद ढिकले, डॉ. रोशनी मिरांडा, डॉ. कीर्ती सुपे, अनिकेत इंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पहिल्या दिवशी १० पेक्षा जास्त नागरिकांनी पिवळा ज्वर प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला. (BMC)

कायमस्वरूपी मिळणार पिवळा ज्वर लसीकरणाचे प्रमाणपत्र

आफ्रिकन देशात जाणाऱ्या भारतीयांना पिवळ्या तापाची लागण होऊ नये यासाठी लसीकरणानंतर देण्यात येणारे प्रमाणपत्र हे पूर्वी दहा वर्षासाठी ग्राह्य धरले जात असे. परंतु, यापुढे देण्यात येणारे प्रमाणपत्र हे कायमस्वरूपी ग्राह्य धरले जाणार आहे. दर दहा वर्षांनी नव्याने प्रमाणपत्र काढण्याची आवश्यकता भासणार नाही. लसीकरणानंतर लाभार्थ्याला अर्धा तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येईल त्यानंतर त्यांना लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.

महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक रूग्णालय (केईएम हॉस्पिटल) आणि सेठ गो. सुं. वैद्यकीय महाविद्यालयात यापूर्वीच पिवळ्या तापाचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रूस्तम नरसी कूपर रुग्‍णालयामध्‍येही पिवळ्या तापाचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील नागरिकांना याचा विशेष फायदा होणार आहे. (BMC)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.