Snowfall In Kashmir : काश्मीरमधील पर्यटक बर्फवृष्टीच्या प्रतीक्षेत

Snowfall In Kashmir : ‘एल् निनो’मुळे बर्फ पडलेला नाही, तसेच समुद्राचे तापमान ०.५ अंशांनी वाढले आहे. यामुळे संपूर्ण देशात हवामानाचा अंदाज बदलला आहे.

216
Snowfall In Kashmir : काश्मीरमधील पर्यटक बर्फवृष्टीच्या प्रतीक्षेत
Snowfall In Kashmir : काश्मीरमधील पर्यटक बर्फवृष्टीच्या प्रतीक्षेत

काश्मीरमधील तापमान वजा ३ ते ५ डिग्री सेल्सियस इतके खाली गेलेले असतांनाही यंदा तेथे बर्फवृष्टी झालेली नाही. एरव्ही ज्या ठिकाणी २ ते ५ फूट उंच बर्फ जमा होतो, त्या ठिकाणीसुद्धा एक इंचही बर्फ पडलेला नाही. यामुळे काश्मीरमध्ये येणारे पर्यटक नाराज झाले आहेत. (Snowfall In Kashmir)

(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : आम्ही राम मंदिराचे राजकारण करीत नाही)

१० वर्षांतील ही तिसरी वेळ

काश्मीरमधील वातावरणात झालेल्या या बदलांमुळे अनेक पर्यटकांनी काश्मीरला जाण्याचे रहित केले आहे. काश्मीरच नाही, तर उत्तराखंड (Uttarakhand) आणि हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) राज्यांतही अशीच स्थिती आहे. यापूर्वीही काश्मीरमध्ये बर्फाशिवाय हिवाळे गेलेले आहेत. अशा प्रकारे बर्फाने दडी मारलेली १० वर्षांतील ही तिसरी वेळ आहे.

जम्मू-काश्मीर हवामान विभागाचे संचालक डॉ. मुख्तार अहमद (Mukhtar Ahmed) यांच्या मते, ‘एल् निनो’मुळे बर्फ पडलेला नाही, तसेच समुद्राचे तापमान ०.५ अंशांनी वाढले आहे. यामुळे संपूर्ण देशात हवामानाचा अंदाज बदलला आहे.

भूवैज्ञानिक शकील अहमद यांनी सांगितले की, जागतिक तापमानवृद्धीमुळे २१व्या शतकाच्या अखेरपर्यंत काश्मीरमध्ये ४० वर्षे बर्फाविना जाऊ शकतात. (Snowfall In Kashmir)

(हेही वाचा – MLA Disqualification Case : राहुल नार्वेकर योग्य निर्णय घेतील; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास)

… तर काश्मीर खोर्‍यात दुष्काळ

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) १५ जानेवारीपर्यंत अशीच स्थिती रहाणार आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटी बर्फवृष्टी झाली नाही, तर काश्मीर खोर्‍यातील अनेक भागांत दुष्काळ पडू शकतो.

‘एल् निनो’चा जगातील अनेक देशांवर परिणाम

‘एल् निनो’ (El Nino) ही प्रशांत महासागरात सिद्ध झालेली हवामान स्थिती आहे, जिचा बाष्पाने भरलेल्या मोसमी वार्‍यांवर परिणाम होतो. ‘एल् निनो’चा परिणाम विविध देशांच्या हवामानावर होतो. दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि आसपासचे देश, तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि प्रशांत महासागराला जोडलेले अनेक देश यांना ‘एल् निनो’चा फटका बसतो. (Snowfall In Kashmir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.