DCM Ajit Pawar : पद्मदुर्ग येथे पर्यटन सुविधांच्या निर्मितीसाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून सहकार्य करणार

मुरुडजवळील पद्मदुर्गच्या पर्यटन विकास आराखडा बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पर्यटकांना पद्मदुर्ग किल्लास्थळी जाण्याकरिता आवश्यक सोयीसुविधांची कामे झाली पाहिजेत. या परिसरात जेट्टी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असणारे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ भारतीय पुरातत्व विभागाने तातडीने उपलब्ध करून द्यावे.

150
Ajit Pawar: चौथे महिला धोरण अंमलात आल्याने राज्यातील महिला शक्तीला नवीन ऊर्जा
Ajit Pawar: चौथे महिला धोरण अंमलात आल्याने राज्यातील महिला शक्तीला नवीन ऊर्जा

कोकणच्या पर्यटनविकासासाठी किनारी भागातील जलदुर्गांचा विकास करताना जेट्टीसारख्या सुविधांची उभारणी करावी. रायगड जिल्ह्यातील मुरूड-जंजिरा येथे येणाऱ्या पर्यटकांना पद्मदुर्ग किल्ल्याकडे आकर्षित करण्यासाठी किल्ल्याच्या डागडुजीसह पर्यटन विकासाची कामे हाती घ्यावीत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने पद्मदुर्गचा विकास आराखडा तयार करावा. पद्मदुर्ग येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठी पर्यटन विभागाने सहकार्य करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित (DCM Ajit Pawar) पवार यांनी मंगळवारी (०९ जानेवारी) मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. (DCM Ajit Pawar)

किल्ला संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा

मुरुडजवळील पद्मदुर्गच्या पर्यटन विकास आराखडा बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) म्हणाले की, पर्यटकांना पद्मदुर्ग किल्लास्थळी जाण्याकरिता आवश्यक सोयी-सुविधांची कामे झाली पाहिजेत. या परिसरात जेट्टी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असणारे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ भारतीय पुरातत्व विभागाने तातडीने उपलब्ध करून द्यावे. तसेच किल्ला संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. किल्ल्यावर पर्यटन सुविधा उभारण्याच्यादृष्टीने राज्य शासन आवश्यक सहकार्य करेल. किल्ल्याचे जतन-संवर्धन करण्याच्यादृष्टीने तज्ज्ञ वास्तुविशारदाची नियुक्ती करून आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले. (DCM Ajit Pawar)

(हेही वाचा – National Sports Awards 2023 : मोहम्मद शमी, शीतल देवी यांना अर्जुन पुरस्कार प्रदान)

हेरिटेज दर्जा राखून संवर्धनाची कामे करणे आवश्यक

रायगड जिल्ह्यातील पद्मदुर्ग हा ऐतिहासिक महत्वाचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ मध्ये महाराजांनी सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला बांधला. कुलाबा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग आदी जलदुर्गांची उभारणी करुन काही किल्ल्यांवर जहाजे बांधण्यास प्रारंभ केला. सागरी लाटांच्या माऱ्यामुळे पद्मदुर्ग किल्ल्याच्या भिंती जीर्ण झाल्या आहेत. या किल्ल्याचा हेरिटेज दर्जा राखून संवर्धनाची कामे करणे आवश्यक आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. (DCM Ajit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.