दादरच्या जलतरण तलावांमध्ये सर्पदर्शन : मंगळवारी पकडला धामण जातीचा साप

253
दादरच्या जलतरण तलावांमध्ये सर्पदर्शन : मंगळवारी पकडला धामण जातीचा साप

दादरमधील महात्मा गांधी स्मारक आंतरराष्ट्रीय जलतरण तलावांमध्ये सध्या सापाचा वावर वाढला असून सलग दोन महिन्यांमध्ये दोन साप आढळून आल्याने येथे पोहायला येणाऱ्या सभासदांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या जलतरण तलावाच्या ठिकाणी साप येण्याच्या या वारंवारच्या घटनांमुळे याचा शोध आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये हे साप बाजुच्या जागेमध्ये उभारण्यात आलेल्या प्राणिसंग्रहालयातील असावेत असे अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे याठिकाणी सापांचा वावर होण्यास कोणतेही अनुकूल वातावरण नसताना जर बाजुच्या प्राणिसंग्रहालयातून हे साप जर सुटून येत असतील आणि त्यांची देखभाल जर संबंधित प्राणिसंग्रहालयाला करता येत नसेल तर ते बंद करण्यात यावे अशी मागणी सभासदांकडून केली जात आहे.

दादरमधील महात्मा गांधी स्मारक आंतरराष्ट्रीय जलतरण तलावामधील पंप हाऊसच्या परिसरात मंगळवारी दुपारी धामण जातीचा साप आढळून आला. येथील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीस हा साप पडल्याने सर्प मित्राला बोलावून त्याला पकडण्यात आले. तब्बल पाच फुट लांबीचा हा साप होता. हा साप धामण जातीचा असल्याचे सर्प मित्रांचे म्हणणे आहे. अशाच प्रकारे मागील जून महिन्यात अजगर जातीचा साप दिसून आला होता. या अजगराला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो सर्प मित्राला पुढे सापडलाच नाही. त्यामुळे या परिसरात अजगराचा वावर आजही असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

New Project 2023 07 19T124926.510

मनसेचे विभागप्रमुख आणि या तरण तलावाचे सदस्य असलेल्या संतोष धुरी यांनी काही दिवसांपूर्वी येथील छोट्या प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन तेथील सापांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरण तलावाच्या क्षेत्रात दृष्टीस पडलेल्या अजगराची कल्पना त्यांनी तेथील मुलांना दिली. तेव्हा त्यांनी हे पिल्लू असताना गायब झाले होते,असे सांगितले. त्यामुळे तरण तलावातील अजगर हा या प्राणिसंग्रहालयातील हरवलेले पिल्लू जे आज मोठे होऊन वावरत असावे,असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे हे साप येथील प्राणिसंग्रहालयातीलच असावे असा अंदाज धुरी यांनी व्यक्त करून जर हे प्राणिसंग्रहालय अनधिकृत असेल तर त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

(हेही वाचा – Epidemic : मुंबईत वाढते गॅस्ट्रो, मलेरिया आणि डेंग्यूची साथ साथीचे आजार)

मागील चार ते पाच महिन्यांमध्ये सर्प दर्शनाचे आणि सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोहायला येणाऱ्या सदस्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे यासर्व भागाची पुन्हा एकदा साफसफाई करून याठिकाणी सरपटणारा कोणताही प्राणी नाही याची खातरजमा करावी. कारण येथे येणाऱ्या प्रत्येक सदस्यांची सुरक्षा ही महत्वाची असून भलेही आजवर सापडलेले साप हे बिनविषारी असले तरी सापाला घाबरुन ह्दयविकाराच्या रुग्णांना धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता महापालिका प्रशासनाने तातडीने या प्राणिसंग्रहालयाला नोटीस बजावून त्यांना मान्यता आहे किंवा नाही हे तपासून त्यांच्यावर पुढील कारवाई करावी अशी मागणी धुरी यांनी केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.