Pune Crime : दोन मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना अटक

पुण्याच्या कोथरूड भागातून दोघांनाही अटक करण्यात आली

107
Pune Crime : दोन मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना अटक

पुणे (Pune Crime) पोलिसांनी मोठी कारवाई करत एनआयएकडून वॉन्टेड घोषित करण्यात आलेल्या २ कुख्यात दहशतवादयांना जेरबंद केले. मागील दीड वर्षांपासून ते फरार होते. दोघांवरही एनआयएने ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

पुण्याच्या (Pune Crime) कोथरूड भागातून दोघांनाही अटक करण्यात आली. गस्तीवर असणाऱ्या कोथरूड पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी संशयातून दोघांना पकडले आणि चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोहम्मद ईनुस साखी आणि इम्रान खान अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पुणे पोलिसांच्या (Pune Crime) या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील माहितीनुसार पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कुलकर्णी, पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन गस्तीवर असताना त्यांनी या दोघांना दुचाकी चोरीच्या संशयातून हटकले. मात्र, त्यांची हालचाल ही संशयास्पद दिसली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत आणखी पोलिसांना बोलावून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता कोंढवा परिसरातील त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांना एक लॅपटॉप, ४ मोबाईल तसेच बनावट आधार कार्ड मिळाले. त्यावरून त्यांच्याकडे सखोल चौकशी सुरू करण्यात आली. यादरम्यान चौकशीत काही संशयास्पद माहिती मिळाली.

(हेही वाचा – Heavy Rain : मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प तर रस्ते वाहतूक विस्कळीत)

त्यानंतर पुणे पोलीस (Pune Crime) दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुणे पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर ते दोघे फरार असलेले दहशतवादी असल्याचे समोर आले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. आता पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केलेला मोबाईल, लॅपटॉप यांची तपासणी सुरू केली आहे. तर इतर तपास यंत्रणा देखील पुण्यात दाखल झाल्या आहेत. राजस्थान चितोडगड याठिकाणी एनआयएने एक कारवाई केली होती. तेव्हा काही स्फोटक पकडले गेले होते. त्या गुन्ह्यात हे फरार आहेत. एनआयए कडून या आरोपीवर ५ लाखांचे बक्षीस जाहीर होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.