SIPs Demat Accounts on Rise : एसआयपी आणि डिमॅट खात्यांची वाढती संख्या काय सांगते?

जानेवारी २०२४ मध्ये विक्रमी ५१.८४ लाख लोकांनी नवीन एसआयपी सुरू केल्या.

206
SIPs Demat Accounts on Rise : एसआयपी आणि डिमॅट खात्यांची वाढती संख्या काय सांगते?
SIPs Demat Accounts on Rise : एसआयपी आणि डिमॅट खात्यांची वाढती संख्या काय सांगते?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय शेअर बाजारांत (Indian stock markets) प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या २०२३ मध्ये वाढली आहे. थेट गुंतवणुकासाठी डिमॅट खाती घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. तर अप्रत्यक्ष गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडांत (Mutual funds) एसआयपी करणाऱ्यांची संख्या तर विक्रमी वाढली आहे. विकससनशील देशांमध्ये वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, कंपन्यांची तिमाहीतील चांगली कामगिरी, राजकीय स्थिरता आणि इतर देशांच्या तुलनेनं कमी महागाई दर यामुळे भारतीय शेअर बाजारांवर लोकांचा विश्वास वाढल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. (SIPs Demat Accounts on Rise)

जानेवारी २०२४ मध्ये ५१.८४ लाख लोकांनी म्युच्युअल फंडातील एसआयपी (SIP) नव्याने सुरू केली. डिसेंबरमध्ये हे प्रमाण ४०.३३ लाख इतकं होतं. म्हणजेच डिसेंबरच्या तुलनेत २८ टक्के जास्त लोकांनी म्युच्युअल फंडात नियमित गुंतवणूक सुरू केली आहे. तर गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात १२८ टक्क्यांची वाढ झाली आहे. जानेवारीत देशातील एकूण एसआयपी खाती ७.९२ कोटींवर गेली आहेत. वाढत्या एसआयपी संख्येबरोबरच जानेवारी महिन्यात सुरू असलेल्या एसआयपी थांबवणं किंवा त्यांची मुदत संपल्यावर त्यांचं नुतनीकरण न करणं असे प्रकारही आधीच्या तुलनेत वाढले आहेत. १.८ कोटी लोकांनी त्यांच्या एसआयपी थांबवल्या. तर २३.७९ लाख लोकांनी नुतनीकरण केलंच नाही. डिसेंबर २०२३ च्या तुलनेत हे प्रमाण अनुक्रमे १० आणि १४ टक्क्यांनी जास्त आहे. (SIPs Demat Accounts on Rise)

(हेही वाचा – MCC Panel Recommendation : कसोटी मालिकांमध्ये किमान ३ कसोटी खेळवण्याचा मेरिलबोन क्रिकेट समितीचा आग्रह)

भारतीय शेअर बाजारांवर लोकांचा असलेला विश्वास वाढणार

म्युच्युअल फंडातील (Mutual funds) वाढत्या गुंतवणुकीबरोबरच लोकांनी थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्यालाही प्राधान्य दिलं आहे. जानेवारी २०२४ मध्ये डिमॅट खातं उघडणाऱ्यांची संख्या ४६.८४ लाख इतकी होती. हीच संख्या डिसेंबर २०२३ मध्ये ४०.९४ इतकी होती. देशातील एकूण डिमॅट खात्यांची संख्या जानेवारी २०२४ पर्यंत १४.३९ पर्यंत पोहोचली आहे. गेल्यावर्षी हीच संख्या ११.०५ इतकी होती. एका दिवसांत शेअर बाजारांत होणारी उलाढालही जानेवारी महिन्यात वाढली आहे. कॅश आणि डेरिव्हेटिव्हजमध्ये मिळून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये दर दिवशी सरासरी १.२ ट्रिलियन रुपयांची उलाढाल झाली. जानेवारील सलग दुसऱ्या महिन्यात ही उलाढाल १ ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त होती. (SIPs Demat Accounts on Rise)

ॲक्सिस सेक्युरिटीजमधील एक जाणकार राजेश पालविया यांनी या वाढीचं श्रेय भारतीय बाजारांवर गुंतवणूकदारांचा बसत असलेला विश्वासाला दिलं आहे. ‘किरकोळ आणि छोट्या गुंतवणूकदारांची संख्या वाढतेय हे शेअर बाजाराचं खरं यश आहे. त्यातून भारतीय शेअर बाजारांवर (Indian stock markets) लोकांचा असलेला विश्वास वाढणार आहे. भारतीय शेअर बाजारांतील (Indian stock markets) शेअरच्या किमती अवाजवी वाढल्या आहेत म्हणणाऱ्यांनाही हे उत्तर आहे. कारण, किमती फुगल्या आहेत असं म्हटलं जात असतानाच लोकांनी किरकोळ गुंतवणूकदारांनी विश्वास दाखवल्यामुळे हा बदल झालाय हे सिद्ध होतंय. उलट लोकांचा विश्वास वाढत चालल्याचंच हे द्योतक आहे,’ असं पालविया याविषयी बोलताना म्हणाले. म्युच्युअल फंडातील वाढत्या एसआयपीचा (SIP) ओघ असाच वाढत राहणार असल्याचा अंदाज आहे. (SIPs Demat Accounts on Rise)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.