MCC Panel Recommendation : कसोटी मालिकांमध्ये किमान ३ कसोटी खेळवण्याचा मेरिलबोन क्रिकेट समितीचा आग्रह

अलीकडे घाई घाईने २ कसोटींची मालिका खेळवली जाते. त्यामुळे कसोटीची रंगत कमी होत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

163
MCC Panel Recommendation : कसोटी मालिकांमध्ये किमान ३ कसोटी खेळवण्याचा मेरिलबोन क्रिकेट समितीचा आग्रह
  • ऋजुता लुकतुके

मेरिलबोन क्रिकेट क्लब (Marylebone Cricket Club) हा इंग्लंडमधील प्रतिष्ठित क्रिकेट क्लब आहे. क्रिकेटचे नियम इथंच बनतात. या क्लबच्या जागतिक क्रिकेटविषयक समितीने आयसीसीच्या (ICC) आगामी क्रिकेट कार्यक्रमात किमान ३ आणि पुढे विषम संख्या असलेल्याच कसोटी मालिकांना स्थान द्यावं अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे कसोटी मालिका बरोबरीत न सुटता निकालात निघायला मदत होईल, असं समितीच्या सदस्यांना वाटतं. आणि त्यातून कसोटी क्रिकेटची रंगत टिकून राहील असंही समितीचं मत आहे. (MCC Panel Recommendation)

श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकारा या समितीचा अध्यक्ष होता. मेरिलबोन क्रिकेट क्लबचं मुख्यालय लंडनमध्ये लॉर्ड्सवर आहे. पण, ही बैठक केपटाऊनमध्ये पार पडली. या बैठकीनंतर जारी केलेल्या पत्रकात समितीचे सदस्य म्हणतात, ‘ब्रिस्बेन आणि हैद्राबादमध्ये झालेल्या दोन सुरेख कसोटी सामन्यांनंतर ही बैठक पार पडली. असा कसोटींमुळे कसोटी क्रिकेटची (Test cricket) रंगत लोकांपर्यंत पोहोचते आहे. पण, ऑस्ट्रेलिया मधील कसोटी मालिका मात्र त्या कसोटीनंतर संपली. आणि ऐन रंगात आलेली मैफलच अर्धवट थांबली. कसोटी मालिका किमान ३ कसोटींची असायला हवी.’ (MCC Panel Recommendation)

(हेही वाचा – Ind vs Eng Test Series : इंग्लंड विरुद्ध उर्वरित ३ कसोटींसाठी भारतीय संघ जाहीर)

आयसीसीचा (ICC) २०२८ मधील कसोटी कार्यक्रम जाहीर होईल तेव्हा ३ किंवा त्याहून जास्त कसोटींच्या मालिकांनाच परवानगी देण्यात यावी. त्यामुळे कसोटी क्रिकेट (Test cricket) हा पारंपरिक प्रकार जीवंत राहायला मदत होईल. आणि त्याची रंगतही वाढेल, असा प्रस्ताव या जागतिक क्रिकेट विषयक समितीने दिला आहे. (MCC Panel Recommendation)

हे आहेत इतर सदस्य

डिसेंबर-जानेवारीत झालेली भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकाही २ कसोटींचीच होती. त्यात या मालिकेतील सामने दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीच संपले. त्यामुळे ही चर्चा तेव्हा पहिल्यांदा सुरू झाली होती. कुमार संगकारा यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीती माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली, झुलन गोस्वामी, कुमार धरमसेना, रमीझ राजा, इयॉन मॉर्गन, ग्रॅमी स्मिथ, हिदर नाईट, आणि जस्टिन लँगर हे इतर सदस्य आहेत. (MCC Panel Recommendation)

क्रिकेटला भक्कम आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी भारतीय क्रिकेट मंडळाने केलेल्या प्रयत्नांची या समितीचे स्तुती केली आहे. तर क्रिकेटचा विस्तार इतर देशांमध्येही व्हावा यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरजही व्यक्त केली आहे. (MCC Panel Recommendation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.