Employees’ Provident Fund Organisation: ‘पीएफ’वर मिळणार 8.25 टक्के व्याज, ईपीएफओ’ने जाहीर केले नवीन व्याजदर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हा पगार कर्मचाऱ्यांसाठीचं अनिवार्य योगदान आहे. याव्यतिरिक्त, नोकरी देणाऱ्या कंपन्यांकडूनही ईपीएफ खात्यात संबंधित योगदान देणे आवश्यक आहे.

184
Employees' Provident Fund Organisation: 'पीएफ'वर मिळणार 8.25 टक्के व्याज, ईपीएफओ’ने जाहीर केले नवीन व्याजदर
Employees' Provident Fund Organisation: 'पीएफ'वर मिळणार 8.25 टक्के व्याज, ईपीएफओ’ने जाहीर केले नवीन व्याजदर

देशातील नोकरदारांना दिलासा देणारी बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदर निश्चित केले आहे. ईपीएफओने सन 2023-24 साठीच्या पीएफ ठेवींवर 8.25 टक्क्यांनी व्याज देण्याची घोषणा केली आहे.मागील वर्षी 28 मार्च रोजी ईपीएफओने सन 2022-23 साठी 8.15 टक्के दर जाहीर केला होता. त्यापूर्वी (2021-22) हाच दर 8.10 टक्के इतका होता.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हा पगार कर्मचाऱ्यांसाठीचं अनिवार्य योगदान आहे. याव्यतिरिक्त, नोकरी देणाऱ्या कंपन्यांकडूनही ईपीएफ खात्यात संबंधित योगदान देणे आवश्यक आहे. सरकारी सेवानिवृत्ती निधी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या ईपीएफओचे एकूण 6 कोटींहून अधझिक सदस्य आहेत. दर महिन्याला, कर्मचारी त्यांच्या कमाईच्या 12 टक्के रक्कम त्यांच्याच नावाने असलेल्या ईपीएफ खात्यात योगदान म्हणून देतात. नोकरी देणाऱ्या कंपन्या केवळ 3.67 टक्के ईपीएफ खात्यात जमा करतात, उर्वरित 8.33 टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) मधून वाटप केले जातात. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाद्वारे ईपीएफच्या व्याज दराचे दरवर्षी पुनरावलोकन केले जाते. वित्त मंत्रालयाशी सल्लामसलत केल्यानंतरच हा निर्णय घेतला जातो.

(हेही वाचा – MCC Panel Recommendation : कसोटी मालिकांमध्ये किमान ३ कसोटी खेळवण्याचा मेरिलबोन क्रिकेट समितीचा आग्रह)

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शिफारस केलेले दर विचारात घेऊन अंतिम व्याज दर अधिसूचित केले जातात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यावर दर महिन्याला ही रक्कम गोळा होते. मात्र संबंधित आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्च रोजी या खात्यावरील रक्कमेवर वर्षातून फक्त एकदाच व्याज मिळते. जेव्हा ईपीएफओ एखाद्या आर्थिक वर्षासाठी व्याजदर जाहीर करते आणि वर्ष संपते, तेव्हा प्रत्येक महिन्याच्या शेवटी खात्यावर किती पैसे होते यानुसार व्याज मोजले जाते. त्यानंतर वार्षिक स्तरावर व्याजदर मोजला जातो.

मागील वर्षी, 90,497.57 कोटी रुपयांचे निव्वळ उत्पन्न वितरित करण्याचे उद्दीष्ट होते. सभासदांच्या खात्यात व्याज जमा झाल्यानंतर 663.91 कोटी रुपयांच्या अधिशेषाचा अंदाज होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये, सीबीटीने 2023-24 चे व्याजदर वित्त मंत्रालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय जाहीर करू नयेत असे कामगार मंत्रालयाने सांगितले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.