‘Silver Paplet’ : आता राज्य मासा; मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील पर्यावरण आणि मासेमारी अर्थव्यवस्थेत सिल्वर पॉमफ्रेटला विशेष स्थान आहे.

25
'Silver Paplet' : आता राज्य मासा; मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
'Silver Paplet' : आता राज्य मासा; मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

पापलेट म्हणजे खवय्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. हा सिल्व्हर पापलेट (Silver Paplet) मासा यापुढे राज्य मासा (State fish) म्हणून ओळखला जाणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सोमवारी मुंबईत याबाबत घोषणा केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात आयोजित किसान क्रेडिट कार्ड या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन व डेअरी विकास मंत्री परशोत्तम रूपाला, राज्यमंत्री डॉ. मुरुगन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी राज्यपाल राम नाईक, खासदार गोपाल शेट्टी यांच्यासह सर्व विभागांचे सचिव, अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याच्या मासेमारी उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासोबत सिल्वर पॉम्फ्रेट (पापलेट/सरंगा) मासा त्याच्या स्वादिष्ट चव आणि अपवादात्मक पौष्टिक मूल्यासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील पर्यावरण आणि मासेमारी अर्थव्यवस्थेत सिल्वर पॉमफ्रेटला विशेष स्थान आहे. पापलेट ही मस्त्य प्रजाती नामशेष होऊ नये यासाठी प्रबोधन, नियमन होणे या दृष्टिकोनातून सिल्वर पॉमफ्रेटला (पापलेट/सरंगा) महाराष्ट्राचा “राज्य मासा” म्हणून घोषित करण्याच्या मागणीचे सातपाटी येथील दोन्ही मच्छीमार सहकारी संस्थांचे संयुक्त निवेदन मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले होते.

(हेही वाचा – Maharashtra University of Health Sciencesच्या व्यवस्थापन परिषदेवर ‘या’ डॉक्टरांची निवड)

महाराष्ट्राच्या सागरी जलधी क्षेत्रातील पॅम्पस (सिल्वर पॉमफ्रेट) या उल्लेखनीय मत्स्य प्रजातीचे जतन करण्यासोबतच सागरी परिसंस्थेचे रक्षण, लहान मासळीच्या (Juvenile fishing) मासेमारीला आळा घालणे आणि शाश्वत मासेमारी पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या महत्त्वपूर्ण गरजेबद्दल जागरूकता वाढविणे आवश्यक आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यात सिल्वर पॉमफ्रेट हा मासा “राज्य मासा” घोषित करण्यात आला आहे.
– सुधीर मुनगंटीवार, वने, सांस्कृतिक कार्ये व मत्स्यव्यवसाय.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.