WhatsAppचे नवे फिचर; १० सेकंदाचे पाठवू शकतात व्हिडिओ

88

व्हॉट्स अॅप (WhatsApp) आपल्या वापरकर्त्यांसाठी नवे फिचर लाँच करत असते. WhatsApp जगभरात मोठ्या संख्येने वापरले जाते. व्हॉट्स अॅपने आता वापरकर्त्यांसाठी एक नवे फिचर लाँच केले आहे. यामुळे वापरकर्त्यांना फायदा होणार आहे. रिअल टाईम व्हिडीओ मेसेजची सुविधा व्हॉट्सअॅपने गेल्या महिन्यातच सुरू केली होती. यामध्ये यूजर्स ६० सेकंदांचे छोटे व्हिडीओ पाठवू शकतात. पण आता हे फीचर नियंत्रित करण्यासाठी अॅपच्या सेटिंग्जमध्ये नवीन टॉगलचा समावेश करण्यात आला आहे. याच्या मदतीने इन्स्टंट मेसेज फीचर डिसेबल करता येईल. आणि त्याऐवजी व्हॉइस मेसेज पाठवले जाऊ शकतात.

याआधी हे फीचर बाय डीफॉल्ट उपलब्ध होते. WABetaInfo च्या अहवालानुसार, टॉगल बटण व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना व्हिडीओ मेसेज पाठविण्याची सुविधा मॅन्युअली अक्षम आणि सक्षम करण्याचा पर्याय देते. हे टॉगल व्हॉट्सअॅपच्या (WhatsApp) सेटिंग्ज ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. हा फायदाही आहे. आता टच बटणाला टच केल्यावर व्हिडीओ थेट पाठवला जाणार नाही. तुम्ही फोनमधील फीचर अक्षम केले तरीही तुम्हाला व्हिडीओ मेसेज मिळत राहतील. हे फिचर अशा वापरकर्त्यांसाठी अधिक फायदेशीर ठरेल जे झटपट व्हिडीओ संदेशांऐवजी व्हॉइस नोट्स पाठवण्यास प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत व्हॉट्सअॅपने आपल्या वापरकर्त्यांना दोनपैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन फिचर सादर करत आहे, जेणेकरून वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅप वापरणे सोपे होईल. यासाठी व्हॉट्सअॅप ईमेल व्हेरिफिकेशन फीचरवर काम करत आहे. या फीचरच्या रोलआउटनंतर, व्हॉट्सअॅप अकाउंट ईमेलद्वारे लॉग इन केले जाऊ शकते.

(हेही वाचा G20 Summit : जाणून घ्या, कोणत्या देशाचे प्रमुख राहणार उपस्थित, कोण राहणार गैरहजर?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.