Shiv Jayanti 2024 : शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी महाराजांचा पाळणा हलवला

शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ११०० पोलीस आणि होमगार्डचा बंदोबस्त तैनात आहे.

200
Shiv Jayanti 2024 : शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी महाराजांचा पाळणा हलवला

आज १९ फेब्रुवारी रोजी तारखेनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (Shiv Jayanti 2024) आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यासह देशात शिवजयंती (Shiv Jayanti) मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. राज्यातील शिवप्रेमींमध्ये उत्साह दिसून येत आहे. अशातच शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराजांचा पाळणा हलवला.

(हेही वाचा – Shivjayanti 2024 : दांडपट्टा राज्यशस्त्र म्हणून घोषित करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार)

दरवर्षी शिवजयंतीच्या (Shiv Jayanti 2024) दिवशी मंत्री शिवनेरी गडावर येतात तेव्हा शिवभक्तांना प्रवेश बंदी केली जाते, त्यामुळे शिवभक्तांमध्ये असंतोष पसरतो. मात्र यंदा मंत्री शिवनेरीवर आल्यावर शिवभक्तांना गडावर प्रवेश देण्यात आला.

शिवजन्मोत्सवाच्या वेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित –

शिवजन्मस्थळाच्या (Shiv Jayanti 2024) उत्तरेला अभिवादन सभेचा मंडप उभारण्यात आला आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. गडावरील शिवजन्मोत्सव सोहळ्याचा कार्यक्रम मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आला. यावेळी शासकीय मानवंदना, मर्दानी खेळ; तसेच शिवचरित्रावरील प्रबोधनात्मक पोवाड्याचे सादरीकरण करण्यात आले.

(हेही वाचा – Manoj Jarange : जरांगे आपल्या मागणीवर ठाम, २१ फेब्रुवारीला ठरणार आंदोलनाची दिशा)

शिवनेरीवर मोठा पोलीस बंदोबस्त

शिवनेरीवर शिवजयंती (Shiv Jayanti 2024) सोहळ्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ११०० पोलीस आणि होमगार्डचा बंदोबस्त तैनात आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. तसेच शासकीय कार्यक्रम लवकर संपवणार आहे. त्यामुळे सकाळी १० वाजेनंतर शिवभक्तांनी गड चढायला सुरुवात करावी, असं प्रशासनाकडून आवाहन करण्या आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभेचं ठिकाण बदललं

दरवर्षी शिवनेरी गडावरील शिवजंतीचा पाळणा (Shiv Jayanti 2024) पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा होते. यावेळेस या सभेचे ठिकाण बदलण्यात आलं आहे. दरवर्षी या सभेचं ठिकाण गडाच्या सुरुवातीलाच असायचे, यावेळी ही सभा गडावरच पण शिवजन्माच्या ठिकाणाच्या पलिकडे होणार आहे. त्यासाठी पुरातत्व विभागाने परवानगी दिली आहे.

(हेही वाचा – Shiv Jayanti : आग्रा किल्ल्यावर दुमदुमणार शिवरायांचा जयघोष)

शिवभक्तांसाठी पार्किंगची सोय –

शिवनेरीवर (Shiv Jayanti 2024) येणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी जुन्नर शहरात २८ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवभक्तांची याच ठिकाणी आपली वाहने लावावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवरायांच्या  (Shiv Jayanti) जन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांना शिवनेरीवर एकेरी मार्गाने जाता येईल. शिवभक्तांना शिवकुंज इमारतीसमोरील गेटमधून आत येता येईल. पुढे जुन्या सदरेला वळसा घालून शिवजन्मस्थळाला अभिवादन करता येईल. यानंतर प्रदक्षिणा मारून दुसऱ्या बाजूने बाहेर पडता येणार आहे. (Shiv Jayanti 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.