Sewage Channels : भांडुपसह विक्रोळीतील मलवाहिन्यांचे जाळे मजबूत होणार, घरोघरी शौचालय बांधण्याचे स्वप्न होईल साकार

मुंबईत घरोघरी शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईतील अनेक भागांमध्ये मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे मजबूत करण्यात येत आहे. त्यामुळे विक्रोळी ते भांडुप परिसराला मलनि:सारण वाहिन्यांची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्यावतीने या मलवाहिन्यांचे जाळे पसरवले जात आहे.

152
Sewage Channels : भांडुपसह विक्रोळीतील मलवाहिन्यांचे जाळे मजबूत होणार, घरोघरी शौचालय बांधण्याचे स्वप्न होईल साकार
Sewage Channels : भांडुपसह विक्रोळीतील मलवाहिन्यांचे जाळे मजबूत होणार, घरोघरी शौचालय बांधण्याचे स्वप्न होईल साकार
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबईत घरोघरी शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईतील अनेक भागांमध्ये मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे मजबूत करण्यात येत आहे. त्यामुळे विक्रोळी ते भांडुप परिसराला मलनि:सारण वाहिन्यांची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्यावतीने या मलवाहिन्यांचे जाळे पसरवले जात आहे. त्यानुसार भांडुप पूर्व येथील पूर्व द्रुतगती महामार्गालगतचा सेवा रस्त्यावरुन ही मलवाहिनी टाकली जाणार आहे. ज्यात सेठ गोविंदराम जॉली मार्ग ते जेव्हीएलआर आणि पूर्व द्रुतगती महामार्ग ते भांडुप पंपिंग स्टेशन या भागांमध्ये १२०० ते २४०० मि.मी व्यासाच्या विविध एकूण ५३९० मीटर लांब मलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या भागांतील मलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाल्यास विक्रोळीसह भांडुप भागासह विक्रोळीतील कन्नमवार नगर, टागोर नगर या म्हाडा वसाहतीला होणार आहे. तसेच या भगातील झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांचे घरोघरी शौचालय बांधण्याचे स्वप्न साकार होणार आहे. (Sewage Channels)

मुंबई महापालिकेच्यावतीने मुंबई मलनि:सारण सुधारणा कार्यक्रम टप्पा २ अंतर्गत मलनि:सारणासाठी अनेक अनेक पायाभूत सुधारणा करण्यात येत आहे. या अंतर्गत सध्याच्या व भविष्यकालीन गरजा भागवण्यासाठी व सध्या अस्तित्वात असलेल्या मलनि:सारण वाहिन्यांचे आकारमान वाढवण्यात येत आहे. वाहनांच्या आणि पादचाऱ्यांच्या वाहतुकीला अडथळा न आणता अत्यंत व्यस्त अशा काँक्रीट तथा डांबरी रस्त्याखालून ट्रंक सिवर नेहमीच्या चर पध्दतीने टाकणे अशक्य असल्याने महापालिकेने महामार्ग व रेल्वे ट्रॅकच्या खालून मलनि:सारण वाहिन्यां टाकण्यासाठी मायक्रोटनेलिंगचे चरविरहित तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. (Sewage Channels)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : राज्यातील पायाभूत आरोग्य सुविधांत क्रांती होईल; दावोस येथील परिषदेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा विश्वास)

यासाठी मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे नव्याने टाकण्याची गरज 

रस्त्याखालील केबल व इतर सेवांना अडथळा न आणता वाहिन्या टाकण्याची प्रगत पध्दत असल्याने सुश्म बोगदा पध्दतीने या मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे टाकले जाते. अशा तंत्रज्ञानाचा वापर करणारी मुंबई हे भारतातील पहिले शहर आहे आणि पहिली महापालिका आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगरचा परिसर हा म्हाडा रहिवासी वसाहतीचा भाग आहे. या वसाहतीतील मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे म्हाडा खूप वर्षांपूर्वी टाकलेले असून सध्या म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास होऊन टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे नव्याने टाकले जाण्याची गरज निर्माण झाले आहे. (Sewage Channels)

त्यामुळे या मलनि:सारण वाहिनीमुळे एलबीएस मार्ग, आदि शंकराचार्य मार्ग, पवई, टागोर नगर, कन्नमवार नगर व आसपासच्या परिसरात मलप्रवाह या नवीन मलवाहिनीत वळवण्यात येणार आहे. या नव्याने १२०० ते २४०० मि.मी व्यासाच्या विविध एकूण ५३९० मीटर लांबीची मलवाहिनी टाकण्यात येणार असल्याने भांडुप परिसराला फायदा होईलच शिवाय विक्रोळीतील म्हाडा वसाहतीला फायदा होईल. यामुळे या भागातील ज्या वस्त्या मल वाहिन्यांनामुळे जोडल्या गेल्या नव्हत्या, त्या जोडल्या जातील आणि झोपडपट्टी परिसरातील लोकांना आपल्या घरी शौचालय बांधण्याचे स्वप्न पुर्ण होईल.दरम्यान या कामांसाठी महापालिकेच्यावतीने मिशिगन इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड केली आहे. या कामासाठी विविध करांसह २१५ कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. (Sewage Channels)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.