BJP : शर्मिष्ठा मुखर्जी भाजपमध्ये जाणार; काँग्रेसला धक्का

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ‘प्रणब माय फादर : ए डॉटर रिमेंबर्स’ या पुस्तकातून अनेक धक्कादायक राजकीय खुलासे केले आहेत. तसेच त्यांनी पुस्तकात राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जींना का स्थान मिळाले नाही, यावरही मोठा दावा केला आहे.

207
BJP : शर्मिष्ठा मुखर्जी भाजपमध्ये जाणार; काँग्रेसला धक्का
BJP : शर्मिष्ठा मुखर्जी भाजपमध्ये जाणार; काँग्रेसला धक्का

काँग्रेसला (Congress) आणखी एक जोरदार राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी (Sharmistha Mukherjee) या भारतीय जनता पक्षात (Bharatiya Janata Party) जाणार असल्याची जोरदार राजकीय चर्चा सध्या राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. (BJP)

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी (Sharmistha Mukherjee) यांनी ‘प्रणब माय फादर : ए डॉटर रिमेंबर्स’ या पुस्तकातून अनेक धक्कादायक राजकीय खुलासे केले आहेत. तसेच त्यांनी पुस्तकात राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जींना (Pranab Mukherjee) का स्थान मिळाले नाही, यावरही मोठा दावा केला आहे. त्यांनी याच पुस्तकात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांंच्याबाबतही अनेक दावे केले आहेत. याच शर्मिष्ठा मुखर्जी (Sharmistha Mukherjee) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (BJP)

(हेही वाचा – Cyber Crime : सावध रहा! आवाज क्लोन करून केली जात आहे ऑनलाईन फसवणूक)

पंतप्रधान मोदी कायमच कनवाळू – शर्मिष्ठा मुखर्जी

दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी (Sharmistha Mukherjee) या सध्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. त्यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीवेळी शर्मिष्ठा मुखर्जींनी (Sharmistha Mukherjee) ‘प्रणब माय फादर : अ डॉटर रिमेम्बर्स’ हे पुस्तकही मोदींना भेट दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) भेट घेतल्यावर शर्मिष्ठा X वर एक पोस्ट केली आहे. या पोस्टची काँग्रेससह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या, माझ्या पुस्तकाची एक प्रत मी मोदींना भेट दिली. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) कायमच माझ्याबाबत कनवाळू राहिले आहेत. आणि बाबांप्रती त्यांचा असलेला आदर किंचितही कमी झालेला नाही असेही शर्मिष्ठा मुखर्जी (Sharmistha Mukherjee) यांनी म्हटलं आहे. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.