MNSच्या गुढी पाडवा मेळाव्यावर वेगळ्या कॅमेरांची नजर; कोणते असतील ते कॅमेरे, जाणून घ्या

या मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणातील विविध हावभावांचेही चित्रण होणार असल्याची माहिती मिळत आहे. या चित्रपटाच्या शुटींगच्या आखणीतून निर्माते आणि दिग्दर्शक यांनी या सभेच्या ठिकाणांची रेकी केल्याचीही माहिती मिळत आहे.

132
MNSच्या गुढी पाडवा मेळाव्यावर वेगळ्या कॅमेरांची नजर; कोणते असतील ते कॅमेरे, जाणून घ्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा येत्या मंगळवारी गुढी पाडवा मेळावा होणार असून या मेळाव्यावर विशेष कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. हे कॅमेरा म्हणजे माध्यमांचे नसून राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर चित्रित होणाऱ्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग करणाऱ्यांचे असणार आहेत. ठाकरे यांच्या आगामी चित्रपटाची शूटिंग सध्या शिवाजी पार्क परिसरात होत आहे. राज ठाकरे यांच्या भोवतीच चित्रपटाचे कथानक असल्याने या चित्रपटासाठी राज ठाकरे यांच्या शिवतिर्थावरील सभेच्या गर्दीचे चित्रण या गुढी पाडव्याच्या मेळाव्याला जमणाऱ्या विशाल जन समुदायाचे केले जाणार आहे. (MNS)

New Project 2024 04 06T193455.324

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित चित्रपटाचे शूटिंग सध्या जोरात सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात आणि बाजी प्रभू मैदान तथा नारळी बाग परिसरात सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. हा चित्रपट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जीवनावर आधारित आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थासमोरील पार्काच्या कट्ट्यावरच याचे सर्वांधिक शूटिंग झाले असून त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या शेजारील मैदानाच्या परिसरात याचे चित्रण सध्या सुरु आहे. (MNS)

New Project 2024 04 06T193549.886

(हेही वाचा – Sangli मध्ये काँग्रेस बंडखोरीच्या तयारीत?)

मात्र, येत्या मंगळवारी गुढी पाडव्यानिमित्त मनसेचा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर होत असल्याने या मेळाव्याला जमणाऱ्या विशाल गर्दीचेही चित्रण या चित्रपटात दाखवले जाणार आहे. त्यादृष्टीकोनातून गुढी पाडव्याला होणाऱ्या मनसेचे मेळाव्यातील गर्दी या चित्रपटात दाखवली जाणार आहे. त्यामुळे या मेळाव्याच्या दिवशी चित्रपटाच्या शूटिंगचेही कॅमेरे याठिकाणी लावले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) हे आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून शिवाजी पार्कमध्ये गुढी उभारतानाच कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, या मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणातील विविध हावभावांचेही चित्रण होणार असल्याची माहिती मिळत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगच्या आखणीतून निर्माते आणि दिग्दर्शक यांनी या सभेच्या ठिकाणांची रेकी केल्याचीही माहिती मिळत आहे. (MNS)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.