Sanitary Waste : मुंबईत दिवसाला सुमारे दीड टन घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा केला जातो गोळा

132
Sanitary Waste : मुंबईत दिवसाला सुमारे दीड टन घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा केला जातो गोळा
Sanitary Waste : मुंबईत दिवसाला सुमारे दीड टन घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा केला जातो गोळा
  • मुंबई (सचिन धानजी)

वापरलेले सॅनिटरी पॅडस्, डायपर, कालबाह्य औषधी आदी नागरिकांच्या वैयक्तिक वापराशी संबंधित असलेल्या घरगुती स्वच्छताविषयक बाबींच्या संकलनासाठी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) घनकचरा विभागाच्या वतीने ‘घरगुती सॅनिटरी (Household sanitary) आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ (डोमेस्टीक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन) सेवा कार्यान्वित केले आहे. यासाठी १९१९ दुकाने आणि आस्थापना तसेच सोसायट्यांनी नोंदणी केली असून या अंतर्गत ६१.५ टन कचरा गोळा होत आहे. दिवसाला सरासरी १.७ टन याबाबतचा कचरा गोळा होत आहे. (Sanitary Waste)

(हेही वाचा – BMC : मुंबईकरांना पावलोपावली मिळणार थुंकण्यासाठी आणि कचरा टाकण्यासाठी पेट्या)

मुंबईमध्ये (Mumbai) सध्या रोज सुमारे ७ ते ८ हजार टन घनकचरा निर्माण होतो. यापैकी ७० ते ८० टन कचरा हा वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित (Sanitary Waste) असतो. त्यामध्ये प्रामुख्याने वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स, टॅम्पॉन्स, निरोध आणि इतर स्वच्छतासंबंधित बाबींचा तसेच शरीर पुसण्यासाठी वापरलेले विविध द्रवांनी दूषित कापूस, बँडेजेस (जसे की लघवी, रक्त, लाळ, पू, विष्ठा, नखांनी दूषित झालेले), कालबाह्य औषधी (इंजेक्शन, सुई, रेझर ब्लेड्स) आणि श्रृंगार केंद्रामध्ये (Beauty parlour) निर्माण होणारा कचरा (वॅक्सिंग स्ट्रिप्स, पीपीई) आदींचा समावेश असतो. हा अत्यंत घातक प्रकारचा कचरा असला तरी बरेचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि सामान्य घरगुती कचऱ्यामध्येच ते टाकले जाते. त्यामुळे, कचरा संकलित करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या (Sanitary Waste) आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी क्लिष्टता निर्माण होते. (Sanitary Waste)

याच अनुषंगाने, मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन (Bmc swm) विभागामार्फत ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ (डोमेस्टीक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन) सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही सेवा १ मे २०२५ पासून प्रत्यक्षात सुरू केली.

यासाठी महापालिकेच्या वतीने राबवलेल्या नोंदणी प्रक्रियेत १९१९ संस्थानी नोंदणी केली होती.११४० गृहनिर्माण संस्था, ६७७ ब्युटी पार्लर, ७५ शैक्षणिक संस्था,२७ महिला वसतिगृह आदींची नोंदणी झाली असून यात साडेचार लाख लोकसंख्या आहे. या सर्व ठिकाणावरून ६१.५ टन कचऱ्याचे संकलन केले जात आहे. हा कचरा सहा केंद्रात विल्हेवाटीसाठी पाठवला जातो. (Sanitary Waste)

(हेही वाचा – BMC Hospital : खासगी भाडेतत्वावरील रुग्णवाहिकांच्या सेवांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च, पण उपयोग कुणाला?)

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, निरनिराळे उपक्रमही राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या वैयक्तिक वापराशी संबंधित कचरा संकलनाच्या उद्देशाने ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ (डोमेस्टीक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन) सेवा सुरू करण्यात आले आहे. (Sanitary Waste)

स्वच्छताविषयक विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन करण्यासाठी पिवळ्या रंगाच्या पिशव्यांचा वापर केला जाणार आहे. सेवेसाठी नोंदणी केलेल्या आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष जाऊन या कचऱ्याच्या विलगीकरणाबाबत जनजागृतीही केली जात, अशी माहिती दिघावकर यांनी दिली आहे. (Sanitary Waste)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.