
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या विविध सर्वसाधारण उपनगरीय रुग्णालयांच्या वापरासाठी आता साधी रुग्णवाहिनी (Ambulance) आणि हृदयरोग (कार्डियाक) रुग्णवाहिनी भाडेतत्वावर घेतल्या जाणार आहे. महापालिकेच्या भविष्यात चालक अतिरिक्त ठरणार असल्याने या चालकांना रुग्णवाहिकांवर सामावून घेण्यासाठी महापालिकेने दोन वर्षांचे कंत्राट करण्याऐवजी सहा महिन्यांचे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्यावतीने या रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध करून दिली जात असली तरी रुग्णांना पैसे मोजून खासगी रुग्णवाहिकांची सेवा घ्यावी लागत असल्याने या भाडेतत्वावरील रुग्णावहिकांचा नक्की फायदा कुणाला होतो असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांना पडू लागला आहे. दरम्यान, या रुग्णवाहिकांच्या सेवा योग्यप्रकारे लाभ रुग्णांनाच होतो की अन्य कामांसाठी केला जातो यासाठी याासाठी व्हिटीएमएस या प्रणालीचाही वापर करण्याचा प्रशासनाचा विचार असल्याचे बोलले जात आहे. (BMC Hospital)
मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रमुख रूग्णालयांच्या वापरासाठी साधी रुग्णवाहिनी – २० नग (४०१५० सेवा) व हृदयरोग (कार्डियाक) रुग्णवाहिनी (Ambulance) ५ नग (१०९५० सेवा) आदी सेवा भाडेतत्वावर फेब्रुवारी २०२४ पासून घेतल्या जात असून या दोन वर्षांसाठी सुमारे १५ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. हे कंत्राट कंत्राट येत्या मार्च २०२६ रोजी संपुष्टात येत आहे. मात्र, मोठ्या प्रमुख रुग्णालयांसाठी निविदा काढताना प्रशासनाला उपनगरीय रुग्णालयांसाठी लागणाऱ्या रुग्णवाहिकांच्या सेवांचा विसर पडला. त्यामुळे उपनगरीय रुग्णालयांसाठी १४ रुग्णवाहिका आणि ३ कार्डियाक रुग्णवाहिका भाडेतत्वावर घेण्याची मागणी झाल्याने महापालिकेच्यावतीने यासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आली आहे. (BMC Hospital)
(हेही वाचा – ‘Operation Sindoor’ दरम्यान चीन आपल्या शस्त्रास्त्रांची चाचणी करत होता; लष्कर उपसेनाप्रमुखांचे मोठे विधान)
महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण, २०२१ नुसार १ एप्रिल, २०२२ पासून शासकीय वापरासाठी भाडेतत्वावर घेण्यात येणारी सर्व वाहने ही बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक असतील. परंतु, सध्या बाजारात आवश्यक असलेल्या रुग्णवाहिनी (Ambulance) इलेक्ट्रिक वाहनांच्या स्वरूपात उपलब्ध नसल्याने आणि हे काम अत्यंत आवश्यक असल्याने डिझेल अनुरुप वाहने भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या सहा महिन्यांकरता या सेवा भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साधी रुग्णवाहिनी १७ नग (९३०७ सेवा), व हृदयरोग (कार्डियाक) रुग्णवाहिनी ३ नग (१६४२ सेवा) भाडेतत्वावर पुरविण्यासाठी के निर्मल एंटरप्रायझेस कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. (BMC Hospital)
- वांद्रे पश्चिम के. बी. भाभा रुग्णालय : १ साधी आणि १ कार्डिया रुग्णवाहिका
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपरस्पेशालिटी रुग्णालय : २ साधी आणि १ कार्डियाक रुग्णवाहिका
- घाटकोपर राजावाडी रुग्णालय : १ कार्डियाक रुग्णवाहिका
- मालाड पूर्व सका पाटील रुग्णालय : १ रुग्णवाहिका
- म. वा. देसाई रुग्णालय : १ रुग्णवाहिका
- बोरीवली भगवती रुग्णालय : १ रुग्णवाहिका
- सावित्रीबाई फुले रुग्णालय बोरीवली : १ रुग्णवाहिका
- कुर्ला भाभा रुग्णालय : १ रुग्णवाहिका
- गोवडी शताब्दी रुग्णालय : १ रुग्णवाहिका
- विक्रोळी ज्योतिबा फुले रुग्णालय : १ रुग्णवाहिका
- मुलुंड पश्चिम सावरकर रुग्णालय : १ रुग्णवाहिका
- एम. टी. अगरवाल रुग्णालय : १ रुग्णवाहिका
- कस्तुरबा रुग्णालय : २ रुग्णवाहिका
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
