Samriddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दहा ते बारा जणांचा मृत्यू

67
Samriddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दहा ते बारा जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातात (Samriddhi Highway Accident) वाढ होतांना दिसत आहे. अशातच आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात होऊन १० ते १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावरील (Samriddhi Highway Accident) जांबरगाव टोलनाक्याजवळ एका ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात १० ते १२ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परत जात असतांना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स बसने ट्रकला मागून जोरात धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. धक्कादायक म्हणजे अपघातात मृत व्यक्तींमध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे. हे सर्व भाविक नाशिक जिल्ह्यातील होते.

(हेही वाचा – Assembly Election 2023 : प्रचारासाठी खर्च करतांना काळजी घ्या; निवडणूक आयोगाने जाहीर केली खर्चाची मर्यादा)

अधिक माहितीनुसार, या बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. हा अपघात (Samriddhi Highway Accident) १५ ऑक्टोबर रोजी रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला. वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वैजापूरसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात आली. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, घटनास्थळी समृद्धी महामार्गावरील बचाव पथक, वैजापूर पोलीस देखील दाखल झाले असून, मदतकार्य सुरू झाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.