IND vs PAK World Cup : पाक विजय हमासला समर्पित करू शकला नाही; पाकच्या पराभवाचा इस्रायलला आनंद

' PAK विजय हमासला समर्पित करू शकला नाही ', अशा शब्दांत इस्रायलने विश्वचषक सामन्यात भारताच्या विजयावर आनंद व्यक्त केला

90
IND vs PAK World Cup : पाक विजय हमासला समर्पित करू शकला नाही; पाकच्या पराभवाचा इस्रायलला आनंद
IND vs PAK World Cup : पाक विजय हमासला समर्पित करू शकला नाही; पाकच्या पराभवाचा इस्रायलला आनंद

भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलन यांनी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे पोस्टर हलवत असलेल्या भारतीय चाहत्याचे छायाचित्र शेअर केले आणि म्हटले की, इस्रायलला भारताचा विजय झाल्याचा आनंद आहे. (IND vs PAK World Cup)

(हेही वाचा – Health Tips : सूर्यप्रकाशा सारखेच, चंद्र प्रकाशही शरीरासाठी आहे गरजेचा)

इस्रायलने विश्वचषक सामन्यात पाकिस्तानचा पराभव आणि भारताच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलन यांनी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे पोस्टर हलवत असलेल्या एका भारतीय चाहत्याचा फोटो शेअर करत म्हटले आहे की, ‘भारत जिंकल्याचा इस्रायलला आनंद आहे. आता पाकिस्तान आपला विजय हमासच्या दहशतवाद्यांना समर्पित करू शकत नाही.’ (IND vs PAK World Cup)

नाओर गिलन यांनी ट्विट केले की, ‘सामन्यादरम्यान पोस्टर दाखवून भारतीय मित्रांनी इस्रायलशी एकजूट दाखवल्याने आम्ही खरोखर प्रभावित झालो.’ दूतावासाने क्रिकेट चाहत्यांच्या ‘India stands with israel’ पोस्टरबद्दल भारताचे आभार मानले आहेत.

इस्रायल-हमास युद्धात भारत इस्रायलच्या पाठीशी उभा असून भारताने दहशतवादाचा स्पष्ट निषेध केला आहे. परंतु भारत “पॅलेस्टाईनचा एक सार्वभौम, स्वतंत्र आणि व्यवहार्य देशाचा दर्जा मान्य करतो. त्याच वेळी पाकिस्तान इस्रायलचा टीकाकार आणि पॅलेस्टिनी आतंकवाद्यांच्या समर्थक आहे. नुकतेच पाकिस्तानचा क्रिकेटपटू मुहम्मद रिझवानला विश्वचषकातील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने मिळवलेला विजय गाझा येथील जनतेला समर्पित केल्यानंतर भारतामध्ये टीकेला सामोरे जावे लागले होते. (IND vs PAK World Cup)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.