Assembly Election 2023 : प्रचारासाठी खर्च करतांना काळजी घ्या; निवडणूक आयोगाने जाहीर केली खर्चाची मर्यादा

खर्चमर्यादा ओलांडल्याची तक्रार आल्यानंतर चौकशी केली जाईल आणि आरोप सिद्ध झाल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात येईल.

88
Assembly Election 2023 : प्रचारासाठी खर्च करतांना काळजी घ्या; निवडणूक आयोगाने जाहीर केली खर्चाची मर्यादा
Assembly Election 2023 : प्रचारासाठी खर्च करतांना काळजी घ्या; निवडणूक आयोगाने जाहीर केली खर्चाची मर्यादा

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. (Assembly Election 2023) प्रचार चालू झाला असून राजकीय पक्ष रणनीती तयार करण्यात व्यस्त आहेत. मात्र यावेळी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागणार आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारांना निवडणुकीत खर्च करण्याची मर्यादा निश्चित केली आहे. (Assembly Election 2023)

(हेही वाचा – Health Tips : अशी घ्या डोळ्यांची काळजी )

आतापर्यंत उमेदवार मतांसाठी अवाजवी खर्च करत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मागील अनेक निवडणुकांमध्ये उमेदवारांनी लाखो-कोटींचा खर्च केल्याचे वेगवेगळ्या अहवालांतून समोर आले आहे. मात्र आता बेपर्वा खर्च करणाऱ्या उमेदवारांवर निवडणूक आयोग कठोर कारवाई करणार आहे.  (Assembly Election 2023)

प्रचारसभांसाठीची खर्चमर्यादा 
  • एक प्लॅस्टिक खुर्ची ५ रुपये
  • पाईप खुर्ची 3 रुपये
  • VIP खुर्ची 105 रुपये
  • लाकडी टेबल 53 रुपये
  • ट्यूबलाइट 10 रुपये
  • हॅलोजन 500 वॅट 42 रुपये
  • 1000 वॅट हॅलोजन 74 रुपये
  • व्हीआयपी सोफा सेट 630 रुपये
खाद्यपदार्थ
  • आंबा 63 रुपये किलो
  • केळी 21 रुपये किलो
  • सफरचंद 84 रुपये प्रतिकिलो
  • द्राक्षे 84 रुपये किलो
  • पिण्याचे पाणी 20 लिटर कॅन 20 रुपये
  • कोल्ड ड्रिंक, आईस्क्रीम – त्यावरील छापील दराने
  • उसाचा रस 10 रुपये प्रति लहान ग्लास
  • बर्फाचे तुकडे 2 रुपये
  • अन्न प्रति प्लेट 71 रुपये
  • चहा ५ रुपये
  • कॉफी 13 रुपये
  • समोसा 12 रुपये
  • रसगुल्ला 210 प्रतिकिलो
निवडणूक प्रचारादरम्यान झेंडे..होर्डिंग्ज
  • प्लास्टिक ध्वज 2 रुपये
  • कापडी झेंडे 11 रुपये
  • लहान स्टिकर ५ रुपये
  • पोस्टर 11 रुपये
  • कापड आणि प्लास्टिकचे लाकडी कट आऊट – 53 रुपये प्रति फूट
  • होर्डिंग 53 रुपये
  • पॅम्फ्लेट  रुपये   525 प्रति हजार
कार-बस खर्च
  • 5 सीटर कारचे दररोज भाडे 2625 रुपये
  • मिनी बस 20 सीटर 6300 रुपये
  • 35 सीटर बससाठी 8400 रुपये
  • टेम्पो 1260 रुपये
  • व्हिडिओ व्हॅन 5250 रुपये
  • चालकाला दररोज ६३० रुपये मजुरी

निवडणूक आयोगाने नियुक्त केलेली टीम प्रत्येक जिल्ह्यातील उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवणार आहे. खर्चमर्यादा ओलांडल्याची तक्रार आल्यानंतर चौकशी केली जाईल आणि आरोप सिद्ध झाल्यास निवडणूक आयोग कारवाई करेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.