Rs 2000 Currency Notes : ९७.३८ टक्के २००० रुपयाच्या नोटा बँकांकडे परत आल्याची रिझर्व्ह बँकेची माहिती

बँकांकडे परत न आलेल्या किंवा लोकांकडे असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांचं मूल्य तब्बल ९,३३० कोटी रुपये इतकं आहे.

145
Rs 2000 Currency Notes : ९७.३८ टक्के २००० रुपयाच्या नोटा बँकांकडे परत आल्याची रिझर्व्ह बँकेची माहिती
Rs 2000 Currency Notes : ९७.३८ टक्के २००० रुपयाच्या नोटा बँकांकडे परत आल्याची रिझर्व्ह बँकेची माहिती
  • ऋजुता लुकतुके

बँकांकडे परत न आलेल्या किंवा लोकांकडे असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांचं मूल्य तब्बल ९,३३० कोटी रुपये इतकं आहे. (Rs 2000 Currency Notes)

दोन हजार रुपये मूल्याच्या ९७.३८ टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे (Reserve Bank) परत आल्याची माहिती मध्यवर्ती बँकेनं दिली आहे. पण, त्याचवेळी ज्या नोटा अजून परत आलेल्या नाहीत किंवा लोकांकडेच आहेत, अशा नोटांचं मूल्यही तब्बल ९,३३० कोटी रुपये इतकं असल्याचं स्पष्ट केलं आहे. (Rs 2000 Currency Notes)

९७.३८ टक्के नोटा बँकेकडे जमा

१९ मे २०२३ ला रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) २००० रुपयांचा नोटा मागे घेत असल्याचं जाहीर केलं होतं. आणि या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत सप्टेंबर २०२३ असल्याचंही बँकेनं स्पष्ट केलं. ही घोषणा करताना ३.५६ लाख कोटी रुपये २,००० रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात बाजारात होते. पण, यातील ९७.३८ टक्के नोटा आता बँकेकडे जमा झाल्या आहेत. (Rs 2000 Currency Notes)

२००० रुपयाची नोट चलनातून बाद झाली असली तरी अजूनही ते कायदेशीर चलन आहे, असं रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) स्पष्ट केलं आहे. म्हणजे तुमच्याकडे ही नोट सापडणं हा गुन्हा नाही. फक्त आता तुम्हाला दैनंदिन कामांसाठी ही नोट वापरता येणार नाही. (Rs 2000 Currency Notes)

(हेही वाचा – Assam Accident : आसाम मध्ये बस आणि ट्रकच्या धडकेत १४ ठार, २७ जखमी)

रिझर्व्ह बँकेच्या १९ कार्यालयांमध्ये नोट बदलून घेण्याची सुविधा सुरू

बँकांमध्ये ही नोट जमा करण्याची किंवा ती बदलून घेण्याची मुदत संपली असली तरी अजूनही रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank) १९ कार्यालयांमध्ये ही नोट बदलून घेण्याची सुविधा सुरूच आहे. तिथं जाऊन तुम्ही तुमच्याकडे असलेली दोन हजारची नोट बदलून घेऊ शकता. (Rs 2000 Currency Notes)

रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर बाजारात रोखता राहवी यासाठी २०१६ मध्ये रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) २,००० रुपयांच्या नोटा आणल्या. पण, मे २०२३ मध्ये रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) २,००० रुपयांच्या नोटा सप्टेंबर २०२३ पासून चलनातून बाद होत असल्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर लोकांना आधी सप्टेंबर ३१ आणि नंतर ही मुदत वाढवून ७ ऑक्टोबरची मुदत या नोटा बदलण्यासाठी किंवा बँकेत जमा करण्यासाठी देण्यात आली होती. (Rs 2000 Currency Notes)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.