Ind vs SA 2nd Test : जसप्रीत बुमराह जेव्हा नेट्समध्ये अश्विनची नक्कल करतो 

केपटऊन कसोटीसाठी तयारी करताना भारतीय सराव सत्रात खेळाडूंनी काही हलके फुलके हास्यविनोदही केले. आणि तेव्हाचा जसप्रीत बुमराहचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय

205
Ind vs SA 2nd Test : केपटाऊनमध्ये मिळवलेल्या विजयानंतर ड्रेसिंग रुममधील काही मजेदार क्षण
Ind vs SA 2nd Test : केपटाऊनमध्ये मिळवलेल्या विजयानंतर ड्रेसिंग रुममधील काही मजेदार क्षण

ऋजुता लुकतुके

भारतीय प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचा (Ind vs SA 2nd Test) एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. केपटाऊन कसोटीपूर्वीच्या सराव सत्रातील हा व्हिडिओ आहे. आणि इथं बुमरा चक्क रवीचंद्रन अश्विनची नक्कल करताना दिसतोय. अश्विनच्या हुबेहूब गोलंदाजीच्या शैलीत बुमरा एक चेंडू टाकताना इथं दिसतोय.

पहिल्या सेंच्युरियन कसोटीत झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय संघ केपटाऊनसाठी कसोशीने तयारी करत आहे. आणि त्या कसोटीनंतर भारतीय संघाने एकही दिवस सरावात विश्रांती घेतलेली नाही. पण, सरावादरम्यान असे हलके फुलके क्षण जरुर घालवले.

(हेही वाचा-Assam Accident : आसाम मध्ये बस आणि ट्रकच्या धडकेत १४ ठार, २७ जखमी)

केपटाऊन कसोटीतही भारतीय गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहवरच आहे. आणि इतर गोलंदाजांनी त्याला चांगली साथ दिली तरच भारतीय संघाला विजयाची किंवा निदान झुंज देण्याची आशा धरता येईल. सेंच्युरियन प्रमाणेच केपटाऊनची खेळपट्टी तेज गोलंदाजीला साथ देणारी असणार आहे. त्यामुळे भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांचाही कस लागेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.