Bmc ward officer : सहायक आयुक्तपदांची सर्व रिक्तपदे भरण्यासाठी महापालिका आयुक्तांची भूमिका स्पष्ट

कार्यकारी अभियंता आणि उपप्रमुख अभियंत्यांच्या निवडीची मागणी अमान्य

413
Bmc ward officer : सहायक आयुक्तपदांची सर्व रिक्तपदे भरण्यासाठी महापालिका आयुक्तांची भूमिका स्पष्ट
Bmc ward officer : सहायक आयुक्तपदांची सर्व रिक्तपदे भरण्यासाठी महापालिका आयुक्तांची भूमिका स्पष्ट

मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तपदाची १७ पदे रिक्त असून या पदांवर तात्पुरती व्यवस्था म्हणून कार्यकारी अभियंता यांची नेमणूक केली जात असली तरी प्रत्यक्षात यातील ५० टक्के पदे ही कार्यकारी अभियंता संवर्गातून भरली जावीत अशाप्रकारची मागणी अभियंता संघटनांकडून होत असली तरी प्रत्यक्षात ही मागणी महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी फेटाळून लावली आहे. सहायक आयुक्तांची सर्व रिक्त पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच भरण्यात येणार असून ही सर्व पदे भरण्यासाठी आयोगाकडे सामान्य प्रशासनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली असल्याचे चहल यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई महापालिकेत सहायक आयुक्तपदाची ३६ पदे असून त्यातील १७ पदे ही रिक्त आहे. त्यातील दहा विभागीय सहायक आयुक्तपदी कार्यकारी अभियंता आणि बाजार विभागाच्या सहायक आयुक्तपदी एक अशाप्रकारे ११ कार्यकारी अभियंत्यांवर प्रभारी म्हणून नेमणूक केली आहे. सहायक आयुक्तांची १०० टक्के पदे ही ‘एमपीएससी’ द्वारे भरली जात असताना अभियंता संघटनांनी यातील ५० टक्के पदे ही कार्यकारी अभियंता संवर्गातून भरली जावीत अशाप्रकारची मागणी अभियंता दिनाच्या कार्यक्रमात केली होती.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही मागणी अभियंत्यांच्या संघटनांनी केली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना अभियंता संघटनांनी केलेली मागणी आपल्याला मान्य नव्हती. आपण तेव्हा याबाबत मुख्यमंत्र्यांनाही याची कल्पना दिली आणि त्यानंतर खासदार राहुल शेवाळे आणि अभियंता संघटनेचे प्रतिनिधी यांनाही याची कल्पना ही मागणी मान्य करता येणार नसल्याचे सांगितले. मी या मागणीला तीव्र विरोध दर्शवला आहे. ही पदे ‘एमपीएससी’ द्वारे भरली जावी यावर मी तेव्हाही ठाम होत. कारण ‘एमपीएससी’ द्वारे परिक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराकडे प्रशासकीय कामाची चुणूक असते. त्यांच्याकडे प्रशासकीय कामांचे ज्ञान असते. आपत्कालिन प्रसंगी सहायक आयुक्त जेवढे निर्णय घेऊ शकतात, तेवढे निर्णय कार्यकारी अभियंता किंवा उपप्रमुख अभियंता घेऊन शकत नाही. त्यामुळे जर कार्यकारी अभियंता किंवा उपप्रमुख अभियंता यांच्यामध्ये प्रशासकीय कामांचे कौशल्य असेल तर त्यांनी ‘एमपीएससी’ द्वारे परीक्षा देऊन सहायक आयुक्त बनावे असेही चहल यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – ….यातून थोडं उद्धवजींनी शिकलं पाहिजे – आशिष शेलार)

त्यामुळे महापालिकेच्या सहायक आयुक्तपदाची सर्व रिक्त पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र लोकसेवा आयागोमार्फत भरण्यासाठी कळवण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच ‘एमपीएससी’द्वारे ही परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया राबवली जाईल, असे चहल यांनी स्पष्ट केले आहे. चहल यांनी याबाबत स्पष्ट भूमिकाच जाहीर करून कार्यकारी अभियंता किंवा उपप्रमुख अभियंता पदावरील अधिकाऱ्याची सहायक आयुक्तपदी नेमणूक करण्याचा मुद्दाच आता निकाली काढून टाकला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.