भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘एक सही भविष्यासाठी’ अभियान

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांची माहिती

142
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने 'एक सही भविष्यासाठी' अभियान
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने 'एक सही भविष्यासाठी' अभियान

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मुंबईतील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि युवकांशी संवाद साधणारे ‘एक सही भविष्यासाठी’ हे अभियान सोमवारी १७ जुलै रोजी सुरू होत आहे अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी थेट त्यांच्याकडे जाऊन जे काम मोदी सरकारने केले आहे तेच पारदर्शकपणे मांडून त्यावर युवकांच्या सूचनाही घेणार आहोत असेही आ. ॲड. आशिष शेलार यावेळी म्हणाले.

याबाबत माहिती देताना आमदार अँड. आशिष शेलार यांनी सांगितले की, मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि मुंबईकरांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानतो. ६५ वर्ष काँग्रेसचे राज्य असताना मुंबईकरांना जे मिळाले नाही असे नवीन आयआयएम मुंबईला देण्याची मान्यता देण्यात आली आहे. नुकतीच मंत्रीमंडळाने त्याला मान्यता दिली आहे. मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजीनियरिंग, पवई (नीटी) ला आयआयएमची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे तरुणांना अन्य राज्यात जाण्याची गरज नाही. मुंबईत ३५० जागा एमबीएच्या घेवुन आयआयएम सुरू होणार आहे.

आता आमचे राजकीय विरोधक तोंड बंद का करून आहेत? असा आमचा सवाल आहे. खोट्या आणि विपर्यास असणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करून मुंबईतून, राज्यातून हे गेले बाहेर ते गेलं बाहेर असं खोटं सांगितलं जातं. केवळ राजकीय स्वार्थासाठी काम करणारे उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे असो हे आज मुंबईला आयआयएम आले याच्यावर चकार शब्द काढायला तयार नाहीत. ते आज मूग गिळून गप्प आहेत. मुंबईकरांशी यांचं पुतना मावशीचं प्रेम आहे. अन्य पक्ष राजकारणातले स्कोर सेटल करण्यासाठी काम करतात भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींचे सरकार हे उद्याचे भविष्य घडवण्यासाठी काम करत आहेत. विकासाचे काम करत आहेत असेही ते म्हणाले.

(हेही वाचा – Ajit Pawar : …आणि अजित पवार सिल्वर ओकला गेले)

यावर्षीपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यान्वित होईल. रोजगाराशी संबंधित अभ्यासक्रम त्यात असतील. म्हणून स्वाक्षरी अभियानातून आयआयएमची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल. अगोदरच्या सरकारच्या काळातील एम्सपेक्षा २१४ टक्के वाढ मोदी सरकारमध्ये झाली आहे. मेडिकलच्या पदव्युत्तर जागांमध्ये ९३ टक्के वाढ झाली आहे. हे मोदी सरकारचे यश आहे. या सर्व बाबी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. मेडिकल पदवी संबंधी जागा ७५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. सात नवीन आयआयटी आठ नवीन आयआयएम होत आहे. यामुळे जगाच्या पातळीवर भारतीय विद्यार्थी चमकणार आहेत. शहरी बेरोजगारीचा दर ६.८ टक्क्यांनी कमी झाला हे आकडेवारी सांगते. मुंबईला आज भरभरून मिळत असल्याचा आनंद आम्हाला आहे. या सर्व योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी ‘एक सही भविष्यासाठी’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुंबई आणि देशाचे भविष्य घडवण्याचे काम पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात होत आहे असेही आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.