OBC Reservation : छगन भुजबळ यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा; संभाजीराजे यांचे सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसतांना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप छगन भुजबळ करत आहेत, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

124
OBC Reservation : छगन भुजबळ यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा; संभाजीराजे यांचे सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
OBC Reservation : छगन भुजबळ यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा; संभाजीराजे यांचे सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. (OBC Reservation) त्यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसतांना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप छगन भुजबळ करत आहेत, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी केली आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाविषयी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांच्यावर टीका होत आहे.

(हेही वाचा – Indian Wins Lottery : दुबईतील एका तरुणाला ४५ कोटी रुपयांची लॉटरी, एका रात्रीत करोडपती )

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा नेते आणि ओबीसी नेते समोरासमोर आले आहेत. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अशी मागणी ओबीसी नेत्यांची आहे. ओबीसींना दिलेले अतिरिक्त आरक्षण मराठा समाजाला मिळावे, अशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे जरांगे पाटील यांची मागणी आहे. (OBC Reservation)

जालना जिल्ह्यातील अंबड येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी मोठी सभा घेतली. या वेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, असा इशारा सरकारला दिला आहे. त्यामध्ये राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच मनोज जगांगे पाटील यांच्यावरही टीका केली. या भूमिकेवर संभाजी राजे छत्रपती यांनी फेसबुकवर टीका केली आहे.

(हेही वाचा – Indian Wins Lottery : दुबईतील एका तरुणाला ४५ कोटी रुपयांची लॉटरी, एका रात्रीत करोडपती )

फेसबूकवर लिहिलेल्या आपल्या पोस्टमध्ये संभाजी राजे छत्रपती म्हणाले की, सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल, तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी. (OBC Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.