Indian Wins Lottery : दुबईतील एका तरुणाला ४५ कोटी रुपयांची लॉटरी, एका रात्रीत करोडपती 

संयुक्त अरब अमिरातीतील एका तेल कंपनीत काम करणारा एक कर्मचारी श्रीजू एका रात्रीत तब्बल ४५ कोटी रुपयांचा धनी झाला आहे. त्याने शनिवारचीमहझूज बंपर लॉटरी जिंकली आहे

131
Indian Wins Lottery : दुबईतील एका तरुणाला ४५ कोटी रुपयांची लॉटरी, एका रात्रीत करोडपती 
Indian Wins Lottery : दुबईतील एका तरुणाला ४५ कोटी रुपयांची लॉटरी, एका रात्रीत करोडपती 

ऋजुता लुकतुके

संयुक्त अरब अमिरातीतील शनिवारची प्रसिद्ध बंपर लॉटरी (Indian Wins Lottery) म्हणजे महझूज मिलियन्स लॉटरी. आणि ती जिंकणाऱ्यांमध्ये देशाच्या विविध भागात राहणारे पाच भारतीय आहेत. यातलेच एक श्रीजू यांना तर चक्क ४५ कोटी रुपयांचा बंपर ड्रॉ लागला आहे. त्यामुळे सध्या दुबईत त्यांचं नाव गाजत आहे.

३९ वर्षीय श्रीजू भारतातील केरळमधून दुबईला नोकरीनिमित्ताने गेले आहेत. दुबईपासून १२० किलोमीटर दूर असलेल्या फुजैरा गावात ते एका तेल कंपनीत काम करतात. निम्न मध्यमवर्गीय स्तरातून येणारे श्रीजू इतर अनेक लोकांसारखं लॉटरीतून नशीब आजमावण्याचं स्वप्न बघणारे आहेत.

पण, यावेळी त्यांनी चक्क खूपच मोठी रक्कम जिंकली आहे. ‘मी ऑफिसला जायला निघालोच होतो, इतक्यात फोनवर मेहझूज खातं उघडून बघितलं. तिथे मला मिळालेली रक्कम मी बघितली. पण, माझा विश्वासच बसला नाही. लॉटरीवाल्या कंपनीकडून अधिकृत फोन येईपर्यंत मी कुणालाच याविषयी बोललो नव्हतो. कारण, विश्वासच बसत नव्हता,’ असं श्रीजू यांनी गल्फ न्यूजला दिलेला मुलाखतीत म्हटलं आहे.

श्रीजू यांना आता केरळच्या मूळ गावी घर बांधायचं आहे. कर्जाशिवाय ते बांधता येणार असल्यामुळे ते खूश आहेत. मेहझूज लॉटरीची सोडत दर आठवड्याला बुधवारी होते. आणि शनिवारपर्यंत तुम्ही पैसे भरायचे असतात. ही लॉटरी ऑनलाईन आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं खातंच इथं सुरू करू शकता.

युएईमध्ये अशा लॉटरीची लोकप्रियता मोठी आहे. आतापर्यंत या दर आठवड्याला निघणाऱ्या लॉटरीने ६४ लोकांना करोडपती केलं आहे. गेल्याच आठवड्यात शिवदासन हे आणखी एक भारतीय या लॉटरीतून ११ लाख रुपये जिंकले होते. काही देशांमध्ये लॉटरीला सरकारची मान्यता आहे. भारतात मात्र लॉटरी ही कायद्याने बंद आहे. कारण, लॉटरीचं व्यसनही लागू शकतं. आणि लॉटरीपायी अनेकांनी आपले संसारही उद्धस्त केले आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.