सायरस मिस्त्रींच्या गाडीचा म्हणून झाला अपघात, गाडीत प्रत्यक्ष उपस्थित असणा-याने केला मोठा खुलासा

91

टाटा उद्योग समूहाचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा 4 सप्टेंबर रोजी अपघात झाला होता. या अपघातात मिस्त्री यांना आपले प्राण देखील गमवावे लागले होते. त्यांच्यासोबतच जहांगीर पंडोले यांचे देखील अपघाती निधन झाले होते. पण आता या अपघाताबाबत मोठी माहिती समोर येत आहे.

मर्सिडीज गाडी चालवणा-या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ अनहिता पंडोले यांचे पती डेरियस पंडोले यांनी आपल्या जबाबात अपघाताचे कारण सांगितले आहे.

…म्हणून झाला अपघात

गुजरातहून मुंबईला येणा-या मिस्त्री यांच्या गाडीचा चारोटी येथील सूर्या नदी पुलावर अपघात झाला. रस्त्यावरील तीन लेनच्या अचानक दोन लेन झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे डेरियस पंडोले यांनी सांगितले आहे. जव्हार डीवायएसपींकडे पंडोले यांनी आपला जबाब नोंदवला आहे. अनहिता पंडोले या गाडी चालवत असताना सूर्या नदीच्या पुलावर तीन लेनचा रस्ता कमी होऊन दोन लेन झाला. त्याचवेळी समोरुन वाहन देखील येत होते. त्यामुळे गोंधळलेल्या अनहिता यांना गाडीवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे मर्सिडीज गाडीचा अपघात झाल्याचे पंडोले यांनी जबाबात म्हटले आहे.

(हेही वाचाः भाजपचे ‘हे’ आमदार,खासदार होणार बिगरनिधीचे, खर्चासाठी पक्षाची संमती लागणार)

पोलिस अधिका-यांची माहिती

अपघाताच्या वेळी सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले हे गाडीत मागच्या सीटवर बसले होते. तर गाडी चालवणा-या अनहिता यांच्या बाजूला त्यांचे पती डेरियस बसले होते. या अपघातात मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर पंडोले दाम्पत्य गंभीररित्या जखमी झाले होते. गाडीचा वेग जास्त असल्याने आणि मिस्त्री व जहांगीर पंडोले यांनी सीट बेल्ट न लावल्यामुळे हा अपघात झाल्याचे पोलिस अधिका-यांनी म्हटले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.