RBI 90th Anniversary: आरबीआय भारताला वैश्विकस्तरावर घेऊन जाऊ शकतं, पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास

गेल्या १० वर्षात बँकींग क्षेत्रात मोठ्या सुधारणा झाल्या आहेत. येत्या काळात आणखी बदल घडवायचे आहेत.

110
Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोमवारी चंद्रपुरात सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मुंबईत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI)९०व्या वर्धापन दिनानिमित्त (RBI 90th Anniversary) एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले. यावेळी आरबीआयच्या सर्व कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांनी शुभेच्छा देऊन ते म्हणाले की, देशाच्या विकासात आरबीआयची भूमिका महत्त्वाची आहे तसेच देशाला नवीन दिशा दाखवण्याचे काम आरबीआयने केले आहे. (NARENDRA MODI)

या वर्धापनदिन कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले की, आरबीआयमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, यूपीआयला चालना मिळाली. भारताची बँक व्यवस्था जगातील आघाडीची बँकिंग व्यवस्था मानली जाते. देशाच्या विकासासाठी भारतीय रिझर्व्ह बँक महत्त्वाची आहे. एकेकाळी तोट्यातील अर्थव्यवस्था आज नफ्यात आहे. बँकिंग व्यवस्थेतील स्थित्यंतर हा अभ्यासाचा विषय आहे. २०१४ आधी बँकिंग व्यवस्था डगमगली होती. गेल्या १० वर्षात बँकींग क्षेत्रात मोठ्या सुधारणा झाल्या आहेत. गेल्या १० वर्षात झाले, तो फक्त ट्रेलर आहे. येत्या काळात आणखी बदल घडवायचे आहेत.

(हेही वाचा – SBI Debit Card Charges: एसबीआय डेबिट कार्डच्या शुल्कात ७५ रुपयांची वाढ, ग्राहकांकडून आकारलेल्या विविध शुल्कांची यादी; वाचा सविस्तर)

आरबीआयचे अभिनंदन !
आज तुम्ही जे धोरण बनवाल काम कराल त्याअनुषंगाने आरबीआयच्या पुढील दशकातील दिशा ठरणार आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, आज भारताच्या बॅंकिंग सिस्टिमला स्ट्राँग आणि सस्टेनेबल सिस्टिम मानली जाते. जी बॅंकिंग सिस्टिम डुबणार होती, ती आता नफ्यात आली आहे आणि विक्रम करतेय. मागील १० वर्षांत मोठे परिवर्तन आणणे सोपे नव्हते. आमच्या नीतीमध्ये स्पष्टता होती. आज देश पाहतोय, नियत सरळ असते, तेव्हा नीती सरळ असते, असे सांगून ते पुढे म्हणाले की, पब्लिक सेक्टर सुधारण्यासाठी साडे तीन लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. २७ हजार पेक्षा जास्त अप्लिकेशन ज्यात डिफॉल्ट होत्या. बँकांचा ग्रॉस एनपीए २०१८ मध्ये सव्वा अकरा टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. तो आता २०२३ पर्यंत आता ३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. बॅंकिंग क्रेडिट ग्रोथ १५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. आरबीआयची यात मोठी भूमिका आहे आणि ते अभिनंदनास पात्र आहेत.

आरबीआय भारताला वैश्विकस्तरावर घेऊन जाऊ शकतं
भारताची प्रगती वेगाने व्हावी आणि इक्लुझिव्ह व्हावी यासाठी आरबीआयला पाऊलं उचलावे लागतील. आरबीआय विविध क्षेत्राला लागणाऱ्या गरजांसंदर्भात भूमिका आरबीआयनं घ्यावी, बँकांना मदत करावी, सरकार आरबीआयसोबत आहे. महागाई कमी व्हावी, यासंदर्भात आधी धोरण व्यवस्थित नव्हतं, मात्र पतधोरण समितीनं त्यावर काम केलं. कोरोना आणि युद्धातदेखील महागाई दर आटोक्यात आपण ठेवला. ज्यांचे व्हिजन व्यवस्थित आहे, त्यांची प्रगती होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. जगातील मोठे-मोठे देश कोरोनातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतायत, त्याच भारतीय अर्थव्यवस्था नवे किर्तीमान स्थापित करत आहे. आरबीआय भारताला वैश्विकस्तरावर घेऊन जाऊ शकतं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ९०व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI) यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, अर्थमंत्री निर्मला सीतारमन, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.