SBI Debit Card Charges: एसबीआय डेबिट कार्डच्या शुल्कात ७५ रुपयांची वाढ, ग्राहकांकडून आकारलेल्या विविध शुल्कांची यादी; वाचा सविस्तर

एसबीआय आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारची डेबिट कार्डे पुरवते आणि त्यानुसार वार्षिक देखभाल शुल्क आकारते.

159
SBI Debit Card Charges: एसबीआय डेबिट कार्डच्या शुल्कात ७५ रुपयांची वाढ, ग्राहकांकडून आकारलेल्या विविध शुल्कांची यादी; वाचा सविस्तर
SBI Debit Card Charges: एसबीआय डेबिट कार्डच्या शुल्कात ७५ रुपयांची वाढ, ग्राहकांकडून आकारलेल्या विविध शुल्कांची यादी; वाचा सविस्तर

नवीन आर्थिक वर्ष सोमवारपासून (१ एप्रिल) एसबीआय डेबिट कार्ड शुल्कात ७५ रुपयांची वाढ (जीएसटी वगळता) आकारणार असल्याची माहिती, एसबीआय बँकेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. एसबीआयच्या क्लासिक, सिल्व्हर, ग्लोबल आणि कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्डवर लागू असलेले १२५ रुपये प्लस जीएसटीचे सध्याचे वार्षिक देखभाल शुल्क नवीन आर्थिक वर्षापासून २०० रुपये प्लस जीएसटीमध्ये सुधारित केले जाईल. (SBI Debit Card Charges)

एसबीआय बँकेची वेबसाइट sbi.co.inवर यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, वार्षिक देखभाल शुल्क म्हणून डेबिट कार्ड धारकांकडून ७५ रुपये अधिक (जीएसटी वगळता) आकारेल. त्याचप्रमाणे, बँक युवा, गोल्ड आणि कॉम्बो डेबिट कार्डसाठी देखभाल शुल्क १७५रुपये अधिक जीएसटी वरून २५० रुपये अधिक जीएसटीमध्ये सुधारित करेल.

(हेही वाचा – IPL 2024, Mayank Yadav : १५५.८ किमी प्रतीतास वेगाने चेंडू फेकणारा मयंक इतके दिवस कुठे होता, सगळीकडे चर्चा?)

एसबीआय आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारची डेबिट कार्डे पुरवते आणि त्यानुसार वार्षिक देखभाल शुल्क आकारते. एसबीआयच्या वेबसाइटनुसार, क्लासिक, सिल्व्हर, ग्लोबल आणि कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्डवर लागू असलेले १२५ रुपये प्लस जीएसटीचे वार्षिक देखभाल शुल्क नवीन आर्थिक वर्षापासून २०० रुपये प्लस जीएसटीमध्ये सुधारित केले जाईल. त्याचप्रमाणे, बँक युवा, गोल्ड आणि कॉम्बो डेबिट कार्डसाठी देखभाल शुल्क १७५ रुपये अधिक जीएसटी वरून २५० रुपये अधिक जीएसटीमध्ये सुधारित करेल. प्लॅटिनम डेबिट कार्डसाठी (Platinum Debit Card) वार्षिक देखभाल शुल्क १ एप्रिलनंतर २५० रुपये अधिक जीएसटी वरून ३२५ रुपये अधिक जीएसटी केले जाईल.

दरम्यान, डेबिट कार्ड जारी करणे आणि बदलणे यासारख्या कामांसाठी एसबीआयने आपल्या ग्राहकांकडून आकारलेल्या विविध शुल्कांची यादी – 

तपशील                                                               विद्यमान शुल्क                सुधारित शुल्क
क्लासिक/सिल्वर/ग्लोबल/कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड.           १२५ रुपये+जीएसटी            २०० रुपये+जीएसटी
युवा/गोल्ड/कॉम्बो डेबिट कार्ड/माय कार्ड (Image Card)   १७५ रुपये + जीएसटी        २५० रुपये + जीएसटी
प्लॅटिनम डेबिट कार्ड                                              २५० रुपये + जीएसटी          ३२५ रुपये + जीएसटी
प्राईड/प्रिमियम बिझनेस डेबिट कार्ड                           ३५० रुपये+ जीएसटी          ४२५ रुपये + जीएसटी

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.