Ratnagiri Airport: रत्नागिरी विमानतळावर लवकरच सुरू होणार नाईट लँडिंग सुविधा, पहिली चाचणी यशस्वी

रात्रीच्या वेळी 'लँडिंग' आणि 'टेकऑफ' अशा दोन्ही प्रकारच्या चाचण्यांमुळे रात्री नऊ वाजेपर्यंत रत्नागिरीच्या आकाशात चाचणीसाठीचे विमान घिरट्या घालत होते.

137
Ratnagiri Airport: रत्नागिरी विमानतळावर लवकरच सुरू होणार नाईट लँडिंग सुविधा, पहिली चाचणी यशस्वी

रत्नागिरी विमानतळावर (Ratnagiri Airport) लवकरच नाईट लँडिंगची सेवा सुरू होणार आहे. रविवारी, (२१ एप्रिल) नाईट लँडिंगची पहिली चाचणी यशस्वीपणे पार पडली. भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यातील येथील विमानतळावर आतापर्यंत फक्त दिवसा विमाने उतरू शकतील, अशी सुविधा होती, मात्र आता नाईट लँडिंग सुविधाही उपलब्ध होणार आहे.

भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यात असलेल्या या विमानतळावरून आतापर्यंत केवळ तटरक्षक दलाची हेलिकॉप्टर्स तसेच व्हीआयपींसाठीची छोटी विमाने तीही दिवसा उतरतील, अशी सुविधा होती. नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रत्नागिरीकरांचे विमानातून प्रवास करण्याचे स्वप्नही लवकरच पूर्ण होऊ शकणार आहे. रविवारी सायंकाळी पहिल्यांदाच तटरक्षक दलाच्या विमानाचे ‘नाईट लँडिंग’ झाले. रात्रीच्या वेळी ‘लँडिंग’ आणि ‘टेकऑफ’ अशा दोन्ही प्रकारच्या चाचण्यांमुळे रात्री नऊ वाजेपर्यंत रत्नागिरीच्या आकाशात चाचणीसाठीचे विमान घिरट्या घालत होते.

(हेही वाचा – Ajit Pawar: “निकाल यायच्या आधीच भाजपला विधानसभेत…” अजित पवारांनी केला शरद पवारांवर टीका करताना मोठा गौप्यस्फोट )

पहिले नाईट लँडिंग यशस्वी
केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत रत्नागिरीतून लवकरच विमान झेपावणार आहे. येथील धावपट्टीचे उर्वरित काम पूर्ण झाल्यामुळे नाईट लँडिंग च्या सुविधांची कामे पूर्ण केल्याने रविवारी सायंकाळी तटरक्षक दलाच्या विमानाने पहिले यशस्वी नाईट लँडिंग केले, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.