Rajnath Singh: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सियाचीन दौऱ्यासाठी रवाना, सशस्र दलाच्या जवानांशी साधणार संवाद

89
Rajnath Singh: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सियाचीन दौऱ्यासाठी रवाना, सशस्र दलाच्या जवानांशी साधणार संवाद
Rajnath Singh: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सियाचीन दौऱ्यासाठी रवाना, सशस्र दलाच्या जवानांशी साधणार संवाद

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) सोमवारी, (२२ एप्रिल) सियाचीन दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर तैनात असलेल्या सैनिकांची ते भेट घेतील. गेल्या आठवड्यात भारतीय लष्कराने सियाचीन हिमनदीवर आपल्या अस्तित्वाची ४० वर्षे पूर्ण केली.

काराकोरम पर्वतरांगेत सुमारे २० हजार फूट उंचीवर वसलेला सियाचीन हिमनदी हा जगातील सर्वात उंच लष्करी क्षेत्र म्हणून ओळखला जातो, जिथे सैनिकांना जोरदार बर्फवृष्टी आणि जोरदार वाऱ्यांचा सामना करावा लागतो. ‘ऑपरेशन मेघदूत’ अंतर्गत भारतीय लष्कराने एप्रिल १९८४ मध्ये सियाचीन हिमनदीवर आपले संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केले होते.

(हेही वाचा – PUNE: भोरी आळीमध्ये पहाटे ३ मजली इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी दाखल)

सैनिकांशी संवाद
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सियाचीन दौऱ्यादरम्यान तेथे तैनात असलेल्या सशस्त्र दलाच्या जवानांशी ते संवाद साधतील. भारतीय लष्कराने गेल्या काही वर्षांत सियाचीनमध्ये आपल्या अस्तित्वाची छाप उमटवली आहे. या दौऱ्यादरम्यान संरक्षणमंत्री सैनिकांशी संवाद साधणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.