PUNE: भोरी आळीमध्ये पहाटे ३ मजली इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी दाखल

रविवार पेठेत असलेल्या रामसुख चेंबर्स, भोरी आळी येथे तीन मजली इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर काही दुकाने असून सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास यातील काही दुकांनाना आग लागली.

115
PUNE: भोरी आळीमध्ये पहाटे ३ मजली इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी दाखल

पुण्यातील (PUNE) प्रसिद्ध भोरी आळीमध्ये असलेल्या ३ मजली इमारतीला सोमवारी, (२२ एप्रिल) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग लागल्याचं कळताच नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे इमारतीतील नागरिक तात्काळ बाहेर पडले. (Bhori Ali) 

रविवार पेठेत असलेल्या रामसुख चेंबर्स, भोरी आळी येथे तीन मजली इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर काही दुकाने असून सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास यातील काही दुकांनाना आग लागली. आगीमुळे परिसरात काळेकुट्ट धुराचे लोट पसरले. इमारतीतील रहिवासी तात्काळ बाहेर पडले. त्यांनी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला दिली.

(हेही वाचा – Aasam Rifals : वीर पत्नी आणि माजी सैनिकांसाठी उभारलेल्या नाशिक येथील केंद्राचे उद्घाटन)

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून सध्या आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीमुळे इमारतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. (PUNE)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.