Aasam Rifals : वीर पत्नी आणि माजी सैनिकांसाठी उभारलेल्या नाशिक येथील केंद्राचे उद्घाटन

213

आसाम रायफल्सच्या महासंचालनालयाने, माजी सैनिक (Ex service man) संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील नाशिक (Nashik) येथे पहिले आसाम रायफल्स माजी सैनिक संघटना (Assam Rifles Ex-Servicemen Association) (ARESA) केंद्र २३ मार्च २०२४ रोजी स्थापन केले. यामध्ये माजी सैनिकांना संपर्क साधण्यात सुलभता यावी या हेतूने हे केंद्र उभारले गेले. महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यातील १००० हून अधिक माजी सैनिक आणि वीर नारी या केंद्राशी संलग्न असतील. तसेच हे केंद्र माजी सैनिकांना कल्याणकारी सुविधा आणि सहाय्य सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित असेल महासंचालनालया तर्फे सांगण्यात आले.  (Aasam Rifals)

( हेही वाचा –  Love Jihad : मुलीला धर्मांधाने ठार केले हा लव्ह जिहादच; कर्नाटकातील पीडित मुलीचे वडील काँग्रेसच्या नगरसेवकाने केले मान्य )

२५० हून अधिक परिवाराचे सहभाग 

नव्याने बांधण्यात आलेल्या या केंद्राचे लेफ्टनंट जनरल प्रदीप चंद्रन नायर, ( Lt. Gen. Pradeep Chandan Nair) PVSM, AVSM, YSM, Ph.D, महा निदेशक आसाम रायफल्स यांच्या वतीने आर्टिलरी सेंटर येथील आंबेडकर नगर तोपची सभागृह येथे उद्घाटन करण्यात आले. आसाम रायफल्समध्ये विशेष कामगिरी केलेल्या माजी सैनिकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी  या मेळाव्यात २५० हून अधिक माजी सैनिक, वीर नारी, त्यांचे कुटुंबीय आणि परिवार सहभागी झाले होते. (Aasam Rifals)

माजी सैनिक स्वत: हे केंद्र चालवणार असून, हे केंद्रे माजी सैनिकांना आरोग्य सेवा सहाय्य, व्यावसायिक प्रशिक्षण, समुपदेशन सेवा आणि सामाजिक बाबींसह विविध कल्याणकारी सुविधा प्रदान करण्यारी केंद्र म्हणून काम करणार आहे. 

या कार्यक्रमादरम्यान माजी सैनिकांना त्यांच्या कल्याणासंबंधी योजनांची आणि सैन्य दलाकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीची माहिती व अनुदानाची माहिती पुढीलप्रमाणे :-
  • नैसर्गिक आपत्ती दरम्यान दिले जाणारे आर्थिक सहाय्य (एकाच वेळी दिली जाणारी मदत) बारा हजार रुपये.
  •  सैनिकांच्या विधवांना त्यांच्या दोन मुलींच्या लग्नासाठी वीस हजार रुपयांची मदत.
  • माजी सैनिक आणि सैनिकांच्या विधवा यांना कोणत्याही स्वरूपात वैद्यकीय मदत नव्वद हजार रुपये.
  •  शालेय शिक्षणासाठी इयत्ता अकरावी ते बारावीसाठी वार्षिक पाच हजार रुपये मदत.
  •  उच्च शिक्षण अनुदान केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी (एम टेक, एमबीए, बी टेक, एमबीबीएस, बीडीएस आणि तत्सम)  प्रतिवर्षी दहा हजार रुपये.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यासाठी ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध ) 

आसाम रायफल्स हे देशातील सर्वात जुने आणि सर्वात जास्त पदके प्राप्त करणारे निमलष्करी दल आहे. १८९ वर्षांहून अधिक काळ शौर्याचा आणि बलिदानाचा समृद्ध इतिहास असलेल्या आसाम रायफल्सने विविध मोहीमांद्वारे स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे. तसेच या दलाने बंडखोरी आणि अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यांचे निराकरण करण्यात सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे,  ज्यामुळे हे दल राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण ठरले आहे. (Aasam Rifals )

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.