Virat Kohli भरमैदानात अंपायरवर का संतापला?

168
Virat Kohli भरमैदानात अंपायरवर संतापला
Virat Kohli भरमैदानात अंपायरवर संतापला

आयपीएलच्या 17 व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात जोरदार राडा पाहायला मिळाला. आपल्या आक्रमक बॅटिंग आणि तापट स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीचा (Virat Kohli) पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना रौद्र अवतार पाहायला मिळाला. वादग्रस्तरित्या बाद दिल्याने विराटला संताप अनावर झाला. त्यानंतर विराट जाऊन थेट फिल्ड अंपायरशी भिडला. विराटने या निर्णयाबाबत पंचांकडे नाराजी व्यक्त केली आणि आपला राग व्यक्त केला. मात्र आऊट दिल्यामुळे विराटला नाईलाजाने मैदानाबाहेर जावं लागंल.

नक्की हा वाद कशामुळे झाला? 

आरसीबीकडून कॅप्टन डु प्लेसीस आणि विराट कोहली ही सलामी जोडी 223 धावांचं पाठलाग करायला मैदानात आली. या दोघांनी आक्रमक सुरुवात केली. या सलामी जोडीने पहिल्या 2 ओव्हरमध्ये नाबाद 27 धावा जोडल्या. त्यानंतर हर्षित राणा आरसीबीच्या डावातील तिसरी ओव्हर टाकायला आला. विराट कोहली (Virat Kohli) स्ट्राईक एंडवर होता. हर्षितने टाकलेला पहिला बॉल विराटने मारण्याचा प्रयत्न केला. मात्र हर्षितने आपल्याच बॉलिंगवर विराटचा कॅच घेतला. अंपायरने विराटला बाद घोषित केलं. हर्षितने विराटला टाकलेला पहिला बॉल कंबरेवर होता. त्यामुळे विराटने अंपायरच्या या निर्णयाला आव्हान देत रीव्हीव्यू घेतला. मात्र थर्ड अंपायरनेही फिल्ड अंपायरचा निर्णय योग्य ठरवला आणि विराट बाद असल्याचंच सांगितलं.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या जनजागृतीसाठी अकोला जिल्ह्यात अनोखा उपक्रम)

विराटला थर्ड अंपायरकडून नाबादचा निर्णय अपेक्षित होता. विराट जरी क्रीझमधून बाहेर येऊन हा शॉट खेळला. मात्र तो टाचेवर उभा राहून खेळला. त्यामुळे विराटच्या उंचीत वाढ झाली. मात्र हर्षीतने टाकलेला बॉल कंबरेवर होता. त्यामुळे आऊट न देता नो बॉल असायला पाहिजे होता, असं विराटचं मत होतं. मात्र विराटच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे विराटने थेट अंपायरशीच वाद घातला. विराटला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचं नेटकऱ्यांचं मत आहे. तसेच “मी छाती ठोकून सांगतो की विराट कोहली (Virat Kohli) नाबाद होता”, असं माजी क्रिकेटपटून आणि कॉमेंटेटर नवज्योत सिंह सिद्धू कॉमेंट्री दरम्यान म्हणाले.

दरम्यान आऊट झाल्यानंतर विराट डगआऊटमध्ये न थांबता थेट ड्रेसिंग रुमच्या दिशेने गेला. ड्रेसिंग रुमच्या एन्ट्रान्सच्या इथे पोहचण्याआधी बॅट आपटली. त्यानंतर विराटने कचऱ्याच्या डब्ब्यावर आपला राग काढला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.